Marathi News> हेल्थ
Advertisement

हँडसम दिसायचेय तर शेव्हिंगआधी करा हे एक काम

चांगले दिसण्यासाठी अनेकजण दररोज शेव्हिंग करण्याला पसंती देतात. मात्र या सवयीमुळे स्किन खराब होण्याची अधिक भिती असते

हँडसम दिसायचेय तर शेव्हिंगआधी करा हे एक काम

मुंबई : चांगले दिसण्यासाठी अनेकजण दररोज शेव्हिंग करण्याला पसंती देतात. मात्र या सवयीमुळे स्किन खराब होण्याची अधिक भिती असते. त्यामुळे शेव्हिंग करताना असे प्रॉडक्ट वापरले पाहिजेत ज्यामुळे स्किन खराब होणार नाही. शेव्हिंग केल्यानंतर अल्कोहोल फ्री क्रीमचा वापर करावा. शेव्हिंगच्या अशा काही टिप्स ज्यामुळे तुमची स्कीन डागरहित आणि तुकतुकीत राहण्यास मदत होईल.

शेव्हिंग करताना नेहमी लक्षात ठेवा की रेझरने लांब स्ट्रोक्स लावा. यासोबतच शेव्हिंग करताना ब्लेडवर जास्त प्रेशर नको. यामुळे शेव्हिंग स्मूथ होईल. ब्लेडवर जास्त प्रेशर दिल्यास तुमच्या स्किनला जखम होऊ शकते.

शेव्हिंगसाठी ग्लायकोलिक अॅसिड शेव्हिंग क्रीमचा वापर करा. ही क्रीम एक्सफॉलिएटिंग एजंटचे काम करते. यामुळे डेड स्किन दूर होते तसेच त्वचा मुलायम होते. 

रेझरची योग्य निवड

शेव्हिंग करताना अनेकदा स्किनला जखम होण्याची अधिक भिती असते. शेव्हिंग करताना जळजळ होत असेल तर तुम्ही वापरत असलेला रेझर बदलावा. 

शेव्हिंगआधी स्क्रबिंग केल्याने होतो फायदा

फार कमी पुरुष चेहऱ्याला स्क्रब करणे पसंत करतात. मात्र शेव्हिंगआधी स्क्रबिंग केल्यास चेहऱ्यावरील डेड स्किन दूर होते. यामुळे शेव्हिंग करणे सोपे होते. 

Read More