Marathi News> हेल्थ
Advertisement

पाणीपुरीमध्ये सापडले कॅन्सरचे केमिकल, दररोज खाल्ले जाणारे 'हे' 5 पदार्थ घातक

पाणीपुरी, शोरमा अगदी आवडीने खाल्ले जाणारे पदार्थ शरीरासाठी घातक आहे. धक्कादायक बाब म्हणजे कर्नाटकमध्ये पाणीपुरी कॅन्सर निर्माण करणारे तत्व आढळले आहेत. 

पाणीपुरीमध्ये सापडले कॅन्सरचे केमिकल, दररोज खाल्ले जाणारे 'हे' 5 पदार्थ घातक
Updated: Jul 03, 2024, 08:07 PM IST

FSSA, देशातील सर्वात मोठी अन्न सुरक्षेवर करडी नजर ठेवणारी संस्था आहे. FSSA ला मिळालेल्या माहितीनुसार,  राज्यातील 260 पाणीपुरी नमुन्यांपैकी 22% पाणीपुरीमध्ये सुरक्षा कमी असल्याचे आढळून आले आहे. 

FSSA ने कर्नाटकातील 79 पाणीपुरीच्या स्टॉलच्या ठिकाणांची तपासणी केली, त्यापैकी 49 स्टॉलची ठिकाणे ही बेंगळुरूमध्ये होती. तपासणीत असे आढळून आले की, 260 पैकी 41 नमुन्यांमध्ये कृत्रिम रंग आणि संभाव्य कर्करोगास कारणीभूत रसायने आढळून आली. ज्यामुळे ते खाण्यास योग्य नसून असुरक्षित होते. इतर 18 नमुनेही निकृष्ट दर्जाचे आढळले.

पाणीपुरीमध्ये चब्रिलियंट ब्लू, सनसेट येलो आणि टार्ट्राजिन यांसारखी अनेक हानिकारक रसायने सापडली आहेत. या पदार्थांच्या अतिसेवनामुळे पोटदुखी, हृदयविकार आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होण्यासारखे गंभीर आजार होऊ शकतात, असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.

हा एक कृत्रिम रंग आहे जो सहसा अन्न आणि कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये वापरला जातो. याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने त्वचेची ऍलर्जी आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. हा देखील एक कृत्रिम रंग आहे ज्यामुळे त्वचेवर लाल पुरळ आणि खाज सुटणे यासारख्या ऍलर्जी होऊ शकतात. यामुळे पोटाचा त्रासही होऊ शकतो. सरकारी संस्था त्याचा वापर करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देतात.

हा पेट्रोलियम पदार्थांपासून बनवलेला एक कृत्रिम रंग आहे जो खाद्यपदार्थ आणि पेय आकर्षक दिसण्यासाठी वापरला जातो. यामुळे ॲलर्जी, दमा आणि त्वचेवर पुरळ उठणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे भविष्यात कर्करोग होऊ शकतो.

प्रक्रिया केलेले पदार्थ, लाल मांस, तळलेले पदार्थ, साखरयुक्त पेये, अल्कोहोल, शुद्ध पदार्थ, खारट पदार्थ इत्यादींचे अतिसेवन देखील कर्करोगास कारणीभूत ठरू शकते कारण त्यामध्ये कर्करोग निर्माण करणारे घटक आढळतात.

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)