Marathi News> हेल्थ
Advertisement

मेहंदीचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

पावसाळा सुरु होताच सर्वच झाडांना नवा बहार येतो.

मेहंदीचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

मुंबई : पावसाळा सुरु होताच सर्वच झाडांना नवा बहार येतो. सगळीकडे हिरवाई दिसू लागते. इतर झाडांप्रमाणे मेहंदीच्या पानांनाही पावसाळ्यात बहर येतो. सणवार, लग्नसराई मेंहदी आर्वजून काढली जाते. सौंदर्य खुलवण्यात मेंहदीचे महत्त्वाचे स्थान आहे. पण मेहंदीमुळे फक्त सौंदर्यातच भर पडत नाही तर मेहंदी इतरही अनेक फायदे आहेत. जाणून घेऊया मेहंदीचे इतर फायदे...

नैसर्गिक कंडीशनर

मेहंदीत दही, आवळा, मेथी पावडर घालून मिक्स करा आणि केसांना लावा. १-२ तास केसांवर राहू द्या. त्यामुळे केस काळेभोर, घनदाट आणि चमकदार होतील.

हिट बस्टर

शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी मेहंदीचा वापर केला जातो. हाता-पायांच्या तळव्यांना मेहंदी लावल्याने शरीरातील उष्णता कमी होते.

नैसर्गिक कुलेंट

डोकेदुखी किंवा मायग्रेनसारखे त्रास कमी करण्यासाठी मेहंदी एक उत्तम उपाय आहे. मेहंदी वाटून डोक्याला लावल्याने खूप फायदा होतो.

पेन किलर

गुडघेदुखी किंवा सांधेदुखीची समस्या दूर करण्यासाठी मेहंदी आणि एरेंडलची पाने समान प्रमाणात घेऊन वाटा. हे मिश्रण हलकेसे गरम करुन गुडघ्यांवर लावा. नक्कीच फायदा होईल.

भाजल्यास उपयुक्त

शरीरावर कोठेही भाजल्यास मेहंदीची पाने वाटून त्याचा लेप तयार करा. हा लेप भाजलेल्या जागी लावा. जखम लवकर बरी होईल. 

Read More