Marathi News> हेल्थ
Advertisement

निपाहची लागण झालेल्या रूग्णाची प्रकृती स्थिर

देखरेखीखाली ठेवण्यात आलेल्यांपैकी ५ रूग्णांच्या अवस्थेत सुधारणा होत आहेत.

निपाहची लागण झालेल्या रूग्णाची प्रकृती स्थिर

नवी दिल्ली : एर्नाकुलम येथे राहणाऱ्या २३ वर्षीय तरूणला निपाह विषाणुची बाधा झाल्याचे समोर आले होते. पण आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे देखरेखीखाली ठेवण्यात आलेल्यांपैकी ५ रूग्णांच्या अवस्थेत सुधारणा होत आहेत. जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांमधून एकूण ३११ जणांना देखरेखीखाली ठेवण्यात आल्याचे राज्याच्या आरोग्य मंत्री के के शैलेजा यांनी सांगितले आहे.  

रूग्णालयात ३० मे रोजी दाखल करण्यात आलेल्या २३ वर्षीय रूग्णाची स्थिती स्थिर आहे. मंगळवारी जारी करण्यात आलेल्या वैद्यकीय अहवालात असे सांगण्यात आले आहे. रूग्णाची ताप कमी होत आहे, त्याचप्रमाणे कलमासेरी वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ५ जणांच्या नमुण्याची चाचणी करण्यासाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठवण्यात आले आहे.    

निपाह व्हायरस काय आहे?
- निपाह विषाणुची निर्मिती अत्यंत सहज होते. 
- निपाह विषाणू वटवाघुळामध्ये आढळून येतो. 
- १९९८ मध्ये मलेशियाच्या कम्पंग सुंगाई निपाहमधून या विषाणुचा शोध लागला होता. 
- २००४ मध्ये बांग्लादेशातून काही लोकांना या विषाणुची बाधा झाली होती. 

काय आहेत लक्षणं?
- ३ ते १४ दिवसांपर्यंत ताप आणि डोकेदुखी.
- २४-४८ तासांत व्यक्ती कोमात जाते.
- संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात श्वास घेण्यासही त्रास होतो.
- न्यूरोलॉजिकल समस्या निर्माण होते.
- अंगदुखी.

काय काळजी घ्याल?
- झाडावरुन पडलेली आणि खूप पिकलेली फळे खावू नका.
- या विषाणुने पिडीत व्यक्तींच्या जवळ जावू नका.
- खूप ताप येत असल्यास डॉक्टरांची भेट घ्या.

 

Read More