Marathi News> हेल्थ
Advertisement

Health Tips : नाश्त्यामध्ये ‘हा’ पदार्थ खात असाल तर आजच टाळा, नाहीतर आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Healthy Breakfast:  फिट राहण्यासाठी हेल्दी नाश्ता करणे आवश्यक आहे. त्यामध्ये पण तुम्ही कोणते पदार्थ खावे ज्यामुळे तुम्ही फीट राहाल याबद्दल सविस्तर जाणून घ्या...

Health Tips : नाश्त्यामध्ये ‘हा’ पदार्थ खात असाल तर आजच टाळा, नाहीतर आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Morning Tips: फिट राहण्यासाठी नाश्ता (morning breakfast) नेहमी हेवी आणि हेल्दी असला पाहिजे असे म्हटले जाते. येवढंच नाही, तर नाश्ता करणे टाळले तर वजनाचे प्रमाण वाढू शकते. सकाळी ऑफिसला किंवा कोठेही कामासाठी बाहेर निघताना चांगला नाश्ता करावा, ज्यामुळे दिवसभर शरीर संतुलित राहतं असा सल्ला अनेकदा दिला जातो. हा सल्ला योग्यचं आहे म्हणा. सकाळी जर पोटभर नाश्ता केला तर दुपारी जेवणाच्या वेळेपर्यंत थकवा जाणवत नाही. अशात आता हेल्दी नाश्त्यात काही ऑप्शन आहेत. यामुळंच भारतीय ब्रेकफास्‍टमध्ये ओट्स आणि कॉर्न फ्लेक्‍सने आपली जागा बनविली आहे. फिट राहू इच्छिणारा व्यक्ती नाश्त्यात ओट्स आणि कॉर्न फ्लेक्स पसंत करतात. 

तर दुसरीकडे अनेकजण नाश्त्यामध्ये पांढरे ब्रेड (White bread) खातात. ते ब्रेड आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतात. त्याचा परिणाम म्हणजे वजन कमी होण्याऐवजी वाढण्यास मदत करते. तसेच पांढऱ्या ब्रेडमुळे मधुमेह होण्याची शक्यता असते. त्यामुळे पांढरे ब्रेड खाऊ नये नाहीतर त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. 

पोषणाचा अभाव

अनेकांना पांढऱ्या ब्रेडपासून बनवलेल्या गोष्टी चवदार वाटतात. जसे की, भात, दही, पनीर, ब्रेड अशा अनेक पदार्थ आहेत जे वाईट रंगाचे आहेत. परंतु, शरीराला पोषक ठरण्यासाठी हा उत्तम पर्याय नाही. कारण ब्रेड बनवण्याच्या प्रक्रियेत पिठाचे पौष्टिक मूल्य कमी होते आणि ते रिफाइंड पिठापासून बनवलेले असते. त्यामुळे पचन आणि वजनाच्या समस्या वाढू शकतात. पांढरे ब्रेड खाल्ले तर साखरेची पातळी वाढण्याचा धोकाही असतो.

मधुमेहाचा धोका

पांढऱ्या ब्रेडमध्ये फायबर तसेच प्रोटीनचे प्रमाण खूप कमी प्रमाणात असते. परिणामी व्हाईट ब्रेड (White bread) लवकर पचते आणि शोषण्याची प्रक्रिया जलद होते. रक्तातील साखर वेगाने वाढू शकते. एका संशोधनात असे दिसून आले आहे की ब्रेडसारखे प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाणाऱ्या लोकांना टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका अधिक असतो.

वाचा: नवं वर्ष 12 नाही तर 13 वर्षांचं, 2023 हे वर्ष फार खास असणार 

वजन वाढण्याची शक्यता

पांढऱ्या ब्रेडसारखे कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खाणे टाळावे कारण यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे हे आरोग्यासाठी हानिकारक असल्याने असल्याने, ब्रेड खाऊ नये.

कोणते ब्रेड चांगले

आहारात ग्रेन ब्रेडचा समावेश करावा. पिठापासून बनवलेल्या ब्रेडमुळे शरीराला काम करण्याची शक्ती मिळते. परंतु गव्हाच्या पिठात फायबर आणि इतर अनेक घटक असतात. ग्रेन ब्रेडसोबत फ्रूट-सलाड आणि दुग्धजन्य पदार्थांचा नाश्त्यामध्ये समावेश करणे गरजेचे आहे.

Read More