Marathi News> हेल्थ
Advertisement

'अशा' मुलींशी लग्न करण्यासाठी मुले अधिक उतावीळ असतात!

जोड्या वर जुळतात, असे म्हटले जाते.

'अशा' मुलींशी लग्न करण्यासाठी मुले अधिक उतावीळ असतात!

मुंबई : जोड्या वर जुळतात, असे म्हटले जाते. पण जोडीदाराची निवड करताना प्रत्येकाच्या डोक्यात साथीदाराची एक प्रतिमा असते. तसंच लग्नाळू मुले देखील मुलींमध्ये काही गुण बघतात. काही विशिष्ट गुण असलेल्या मुलींशी लग्न करण्यासाठी मुले अतिशय उतावीळ असतात. पाहुया कोणते आहेत ते गुण...

आत्मविश्वासू

मुलांना आत्मविश्वासू आणि आत्मनिर्भर मुली अधिक आवडतात. मुलीत हे गुण असल्यास मुले लग्नासाठी लगेचच तयार होतात.

समजूतदार

प्रत्येक मुलाला वाटते की, आपली पार्टनर स्मार्ट आणि समजूतदार असावी. तिने प्रत्येक समस्या योग्य प्रकारे हाताळावी. काही मुलांसाठी सौंदर्यापेक्षा समजूतदारपणा अधिक महत्त्वाचा असतो. 

आदर

प्रत्येक मुलाला वाटते की, त्याच्या पार्टनरने त्याचा आणि त्याच्या पालकांचा आदर करावा. हा गुण असलेल्या मुली मुलांना अधिक भावतात.

स्पेस देणे

प्रत्येक व्यक्तीसाठी त्याची स्पेस महत्त्वाची असते. मुलांना तर स्वातंत्र, स्पेस खूप प्रिय असते. त्यामुळे पूर्णपणे स्पेस देणारी पार्टनर त्यांना खूप भावते. 

स्पष्ट बोलणे

कोणालाही आढेवेढे घेऊन बोलण्यापेक्षा स्पष्ट बोलणारी व्यक्ती अधिक आवडते. म्हणून मनात काहीही न ठेवता स्पष्ट बोलणाऱ्या मुली मुलांना आवडतात.

स्वावलंबी

चूल आणि मूल हा जमाना आता राहिलेला नाही. मुलींना आणि त्याचबरोबर मुलांनाही मुलींच्या स्वातंत्र्याचे, स्वावलंबनाचे महत्त्व पटले आहे. त्यामुळे प्रत्येक मुलाला स्वावलंबी मुलगी आवडते. जी कोणावरही विसंबून न राहता स्वावलंबी असेल. 

Read More