Marathi News> हेल्थ
Advertisement

Measles Outbreak: गोवरचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार लागलं कामाला, असा आहे Action Plan

राज्यात एकंदरीत गोवरचा होणारा फैलाव पाहता, राज्य सरकार आता एक्शन मोडमध्ये आलं आहे. तर आतापर्यंत एकूण 18 रूग्णांचा मृत्यू झाल्याचंही समोर आलं आहे.

Measles Outbreak: गोवरचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार लागलं कामाला, असा आहे Action Plan

State Level Task Force for Measles : राज्यात गोवरचा (Measles) प्रसार वेगानं वाढत असल्याचं समोर आलंय. कोरोनापेक्षा (Corona) पाच पट वेगानं गोवर पसरतोय, असा दावाही तज्ज्ञांकडून करण्यात आलाय. दरम्यान राज्यात एकंदरीत गोवरचा होणारा फैलाव पाहता, राज्य सरकार आता एक्शन मोडमध्ये आलं आहे. तर आतापर्यंत एकूण 18 रूग्णांचा मृत्यू झाल्याचंही समोर आलं आहे.

गोवर प्रतिबंधासाठी राज्याचे माजी आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली 11 सदस्यीय राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश आरोग्य मंत्र्याकडून देण्यात आले आहेत. 

गोवरचा प्रसार अतिशय वेगानं होताना दिसतोय. मुंबईसह संपूर्ण राज्यात गोवरच्या रूग्णांची संख्या झपाट्यानं वाढतेय. शून्य ते पाच वर्ष वयोगटातील मुलांना गोवरचा सर्वाधिक धोका आहे. तज्ज्ञांनी गोवरच्या प्रसाराची तुलना थेट कोरोनाशी केलीय. 2 वेळा धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनापेक्षा गोवरच्या प्रसाराचा वेग पाचपट अधिक असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

पाचपट वेगानं पसरतोय गोवर?

रोगाच्या प्रसाराचा वेग हा आर नॉट या एककाच्या माध्यमातून मोजला जातो. एका रुग्णाकडून किती व्यक्तीना विषाणूची लागण होते, यावरून प्रसाराचा हा वेग ठरवला जातो. गोवरची लागण ही एका रुग्णाकडून साधारणपणे 12 ते 14 जणांना होत आहे. त्या तुलनेत करोनाची एका रुग्णाकडून तीन ते चार जणांनाच लागण होत होती. त्यामुळे कोरोनापेक्षा गोवरचा प्रसाराचा वेग अधिक आहे. तर गोवरचा वेगाने प्रसार होत असल्याचा दावा आरोग्यमंत्र्यांनी फेटाळून लावलाय. 

गोवरची काय लक्षणं दिसून येतात?

  • ताप
  • खोकला
  • घसा दुखणं
  • अंग दुखणं
  • डोळ्यांची जळजळ होणं
  • डोळे लाल होणं
  • 5 ते 7 दिवसांत शरीरावर लालसर पुरळ येणं

गोवरचा संसर्ग कोणाला होऊ शकतो?

ज्या बालकांना लस देण्यात आलेली नसते अशा मुलांना गोवरचा संसर्ग होण्याचा धोका होण्याची शक्यता असते. याशिवाय गरोदर महिलांनाही गोवरची लागण होण्याची दाट शक्यता असते. तसंच लसीकरण न झालेल्या कोणत्याही व्यक्तीला गोवर होऊ शकतो. 

Read More