Marathi News> हेल्थ
Advertisement

वडील होण्यासाठी पुरुषांचं योग्य वय किती? या वयानंतर थांबते स्पर्मची निर्मिती

Male fertility Facts: मुलं होण्याच्या बाबतीत पुरुषांच्या वयाइतकंच स्त्रियांचं वय महत्त्वाचं असतं. याचं कारण म्हणजे वाढत्या वयाबरोबर पुरुषांमध्ये स्पर्मची संख्या आणि त्याची गुणवत्ता कमी होऊ लागते.

वडील होण्यासाठी पुरुषांचं योग्य वय किती? या वयानंतर थांबते स्पर्मची निर्मिती

Male Fertility Facts: स्त्रियांना मुलं होण्यासाठी योग्य वय असतं, असं अनेकदा म्हटलं जातं. तुम्हीही याबाबत काहीवेळ ऐकलं असेल. मग पुरुषांच्या बाबतीत ही गोष्ट वेगळी असते का? पुरुष कोणत्याही वयात वडील होऊ शकतात का? असाही प्रश्न समोर येतो. मुलं होण्याच्या बाबतीत पुरुषांच्या वयाइतकंच स्त्रियांचं वय महत्त्वाचं असतं. याचं कारण म्हणजे वाढत्या वयाबरोबर पुरुषांमध्ये स्पर्मची (Sperm) संख्या आणि त्याची गुणवत्ता कमी होऊ लागते.

वडील होण्यासाठी योग्य वय कोणतं?
तज्ज्ञांच्या मतानुसार, पुरुषांसाठी वडील होण्यासाठी 20 ते 30 वर्षे वय योग्य आहे. पुरुष 50 किंवा त्याहून अधिक वयाचे असले तरीही मुलं होऊ शकतात. 

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, एका व्यक्तीने वयाच्या 92 व्या वर्षी मुलाला जन्म दिला. संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे, मुलाला जन्म देण्यासाठी पुरुषांचं वय खूप महत्वाचं आहे. वयाच्या 40 वर्षांनंतर पुरुषांमध्ये बाप (Father) होण्याची शक्यता कमी होऊ लागते.

बायोलॉजिकल क्लॉक
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, पुरुषांमधील स्पर्मचं उत्पादन कधीच थांबत नाही. मात्र वयानुसार, स्पर्मचं डीएनए नुकसान होण्याची शक्यता लक्षणीय वाढते, ज्यामुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. न जन्मलेल्या बाळाच्या आरोग्यावरही त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

अनेक अभ्यासांमधून हे समोर आलंय की, जेव्हा पुरुष मोठ्या वयात पिता होतात तेव्हा मुलांमध्ये न्यूरोडेव्हलपमेंटल विकार होऊ शकतात. 2010 च्या एका अभ्यासात असं आढळून आलंय की, 40 वर्षांनंतर वडील बनलेल्या पुरुषांना त्यांच्या मुलांमध्ये ऑटिझम स्पेक्ट्रम विकसित होण्याचा धोका पाचपट आहे.

कोणत्या वयानंतर स्पर्मची निर्मिती थांबते 
जागतिक आरोग्य संघटनेने स्पर्मचे काही निकष ठेवले आहेत. ज्यावरून निरोगी स्पर्म ठरवले जातात. यामध्ये स्पर्मची संख्या, आकार आणि हालचाल समाविष्ट आहे. त्यानुसार, वयाच्या 35 व्या वर्षी पोहोचताच पुरुषांमध्ये हे स्पर्म पॅरामीटर खराब होऊ लागतं.

या वयात पुरुष सर्वात फर्टाइल
22 ते 25 वर्षांच्या दरम्यान, पुरुष सर्वात फर्टाइल असतात. अशा परिस्थितीत, त्यांना 35 व्या वर्षात मुलं जन्माला घालण्याचा सल्ला दिला जातो. कारण या वयानंतर प्रजनन क्षमता बिघडू लागते. जर तुम्ही वयाच्या 45 वर्षांनंतर मूल होण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read More