Marathi News> हेल्थ
Advertisement

होममेड वॅक्स..घरी सहज बनवा, शेव्हिंगच्या त्रासापासूनही मिळवा कायमची सुटका

तुम्हाला शेव्ह करणं टाळायचं असेल आणि कमी पैशात पार्लरसारखे वॅक्स हवे असेल तर तुम्ही घरीच ते तयार करू शकता.

होममेड वॅक्स..घरी सहज बनवा, शेव्हिंगच्या त्रासापासूनही मिळवा कायमची सुटका

Beauty tips: प्रत्येकला सुंदर दिसायचं असतं, गलोईंग स्किन,नितळ त्वचा कोणाला नको असेल, सुंदर स्कीन मिळवण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करत असतो,वेगवेगळे प्रॉडक्ट्स ट्राय करत असतो...पार्लरमध्ये महागडे ट्रीटमेंट्स घेत असतो ,बऱ्याचदा पार्लरमध्ये ट्रीटमेंटसाठी आपल्याला  खिसा रिकामा करावा लागतो. महिला ब्युटी पार्लरमध्ये खूप पैसा खर्च करतात. चेहऱ्याच्या रंगापासून ते त्वचेच्या चमकापर्यंत, हात-पायांच्या मुलायमपणासाठी महिला विविध प्रकारचे सौंदर्य उपचार करतात. यापैकी एक म्हणजे वॅक्सिंग. वास्तविक, जेव्हा त्वचेवर हलके केस असतात तेव्हा  अनेकदा पार्लरमध्ये वॅक्सच्या सहाय्याने ते काढतात. ज्यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार दिसू लागते.

मात्र हात-पायांच्या वॅक्सिंगसाठी खुप पैसे खर्च करावे लागतात. अशा परिस्थितीत, महिला अनेकदा घरी केस काढण्यासाठी रेझर वापरतात. यामुळे केस कमी पैशात काढले जातात आणि वॅक्सिंगच्या त्रासापासून वाचतात. पण शेव्ह केल्यानंतर स्किन जळू लागते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला शेव्ह करणं टाळायचं असेल आणि कमी पैशात पार्लरसारखे वॅक्स हवे असेल तर तुम्ही घरीच ते तयार करू शकता.
 चला तर मग जाणून घेऊया घरी साखरेपासून होममेड वॅक्स कसा बनवायचा.

 होममेड वॅक्स कसा बनवायचा.

वॅक्सिंगसाठी साखरेचा वापर फार जुना आहे. यामुळे त्वचेला कोणतीही हानी होत नाही तसेच ती अधिक मऊ होते.  होममेड वॅक्स तयार करण्यासाठी दोन कप साखरेसोबत एक चतुर्थांश कप लिंबाचा रस आणि एक चतुर्थांश कप पाणी आवश्यक आहे.  होममेड वॅक्स बनवण्यासाठी एका पॅनमध्ये लिंबाचा रस आणि साखर घालून पाणी गरम करा. साखर तपकिरी रंग येईपर्यंत शिजवा. आणि हातात घेतल्यावर तो गोळा होता कामा नये

होममेड वॅक्स कसा वापराल

आता ते तुमच्या केसाळ भागावर लावा आणि वॅक्स स्ट्रीपप्रमाणे खेचा. एकाच वेळी सर्व केस स्वच्छ होतील. हे होममेड वॅक्स लावताना ते जास्त गरम नाही याकडे लक्ष ठेवा ,अन्यथा त्वचा जळण्याची भीती असते. तसेच, या  होममेड वॅक्समुळे तुमचा पार्लरमध्ये जाण्याचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल. 

आणखी महत्वाची गोष्ट  सामान्य वॅक्सप्रमाणेच ते लावल्यानंतर त्वचेवर लालसरपणा येऊ शकतो. जे थोड्याच वेळात गायब होईल.

लिंबू आणि साखर त्वचा खूप मऊ करते. तसेच, यात कोणतेही हानिकारक रसायने नसतात. वॅक्सिंगमुळे केसांची वाढ कमी होते आणि केसांची वाढ मंदावते. दुसरीकडे, आपण घरी राहिल्यास, वारंवार शेव्हिंग करा आणि त्वचेवर रेझर चालवा. त्यामुळे त्वचेवर जळजळ होते तसेच केस लवकर येतात. 

त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही घरी सहज बनवलेला हा वॅक्स वापरून पाहू शकता.

Read More