Marathi News> हेल्थ
Advertisement

वंध्यत्वाच्या समस्येवर आयव्हीएफ गर्भधारणेचा पर्याय, जाणून घ्या

पती पत्नीस विश्वासात घेऊनच निर्णय 

वंध्यत्वाच्या समस्येवर आयव्हीएफ गर्भधारणेचा पर्याय, जाणून घ्या

मुंबई : आयव्हीएफ म्हणजे इन विट्रो फर्टीलायझेशन अर्थात  जे शरीरात होते तेच शरीराबाहेर एका कार्यशाळेत घडवणे. महिलेच्या मासिक पाळीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवसापासून इंजेक्शन्स चे कोर्स सुरू होतात. हे इंजेक्शन्स स्त्री हॉर्मोन्स चे असतात जेणे करून मासिक पाळीत फक्त  एका बीजाची वाढ  न होता बरेच बिजांची वाढ व्हावी. जेव्हा बीजांची वाढ सोनोग्राफी ने पर्याप्त झाल्याचे आश्र्वस्त होते तेव्हा एक अखेर चं इंजेक्शन देऊन ३५-३६ तासात बीज काढले जाते अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

साधारणतः १०-१३ दिवसात बीज काढण्या जोगे होते. बीज काढण्या च्या प्रक्रिये ला 'ओवम पिक अप' असे म्हणतात. बिन टाक्याची शस्त्रक्रिया असते. शस्त्रक्रीयेनंतर महिला पुर्वी सारखीच आपले दैनंदिन कार्य करू शकते. बीज कार्यशाळेत इंक्यूबेटर मध्ये ठेवले जाते. पुरुषाला देखील आपले वीर्य एका निर्जंतुकीकरण केलेल्या डब्ब्यात जमा करण्यास सांगितले जाते. शुक्राणूंवर प्रक्रिया करून चांगले शुक्राणू वेगळे केले जाते. 

'ओवम पिक अप'नंतर २-३ तासात शुक्राणू आणि बीज यांचे  मिलन केले जाते अर्थात फर्टीलाययझेशन . दुसऱ्या दिवशी किती गर्भ तयार झाले ते बघितले जाते. हे गर्भ ५-६ दिवस वाढविले जाते. जर गर्भाशयाची परिस्थिती गर्भ धारणास अनुकूल असेल तर गर्भ पाचव्या दिवशी  गर्भाशयात ठेवण्यात येते अथवा फ्रीझ करून ठेवण्यात येते व आगामी महिन्यात गर्भाशयाची अनुकूल परिस्थिती आढळल्यास ठेवले जाते.साधारणतः १-२ गर्भ  ठेवले जातात, जास्त ट्रान्स्फर करणे योग्य नसल्याचे डॉक्टर सांगतात.

वंधतव्याचे दडपण पती- पत्नी यांच्या नात्यावर पडू शकते.   दोघांचे जगणे तणावपूर्ण होऊ शकते. परंतु जर वंधतव्याचे मुख्य कारण शोधून,  योग्य उपचार पध्दती निवडून पालक व्हायचे स्वप्नं लवकर पूर्ण होऊ शकते. वेळेत उपचार घेतला तर स्वतःचे बीज आणि शुक्राणू वापरण्याची संधी मिळते, जी की अमूल्य आहे.आयव्हीएफ हे 'सेल्फ' किंवा 'डोनर' सायकल असू शकते. 

'सेल्फ' सायकलमध्ये स्त्री बीज आणि पुरुषाचे शुक्राणू हे जोडप्याचे असते.'डोनर' सायकल मध्ये अवशक्यतेनुसर डोनर चे बीज किंवा शुक्राणू अथवा दोन्ही घेऊ शकतो. नोवा आयव्हीएफमध्ये हा नाजूक आणि कठीण निर्णय पती पत्नीस विश्वासात घेऊनच घेतला जात असल्याचे डॉक्टर सांगतात.

डोनर सायकल कधी ?

एखाद्या स्त्रीचा अंडाशय साठा पर्याप्त असेल तर ती स्वतःच्या बिजा पासून देखील गर्भ धारण करू शकते. अंडाशय साठाचा अंदाज लावण्यासाठी 'एएफसी' काउन्ट, एएमएच हार्मोन ची तपासणी करावी लागते. जसेजसे स्त्री चे वय वाढते तसेतसे अंडाशयाची गुणवत्ता कमी होत जाते आणि गर्भधाणेसाठी संधी कमी होत जाते.  सर्वसाधारण ३० वर्षांनंतर गुणवत्ता कमी होत जाते , प्रत्येक स्त्री मध्ये हे वेगळे असू  शकते  व काही महिलांमध्ये तर २० वर्षांत देखील गुणवत्ता घसरलेली दिसते. आयव्हीएफ मध्ये ३५ वर्ष आतील महिलांमध्ये सफलता जास्त असते.

ज्या पुरुषांमध्ये विर्यात शून्य शुक्राणू आढळतात, अश्या वेळी अत्यंत सोपी प्रक्रियेने अंडकोषातून शुक्राणू काढू शकतो आणि पितृत्वाचा आनंद मिळू शकतो.
 
जोडप्यांनी आपापसातले ऋणानुबंध सांभाळणे, वंध्यत्वावर अभ्यास आणि माहिती गोळा करणे, फर्टीलिटी तज्ज्ञ निवडणे आणि त्यांच्या मार्गदरशनाखालीच योग्य निर्णय घेणे आणि पालकत्वाचे स्वप्नं साकारणे महत्वाचे असते.

Read More