Marathi News> हेल्थ
Advertisement

कारल्याचा कडवटपणा कमी करुन अशी बनवा चटपटीत भाजी! 'या' आहेत टिप्स


Kitchen Tips In Marathi: कडु कारलं हे फार कमी जण आवडीने खातात. कारल्याचे अनेक फायदे आहेत. पण भाजी खरताना कारल्याचा कडवटपणा कसा कमी कराल?

 कारल्याचा कडवटपणा कमी करुन अशी बनवा चटपटीत भाजी! 'या' आहेत टिप्स

Kitchen Hacks: कारलं हे गुणकारी आणि शरीरासाठी लाभदायक असते. पण कारल्याच्या कडुपणामुळं अनेकजणा कारलं पाहून नाकं मुरडतात. खासकरुन लहान मुलं कारल्याच्या भाजीचं नाव ऐकूनही तोंड वाकडं करतात. पण कारल्यात असलेल्या गुणधर्मांमुळं ते प्रत्येकाने खावे असा सल्ला दिला जातो. कारल्याची भाजी करत असतानाही त्याचा कडवटपणा घालवणे अनेक गृहिणींना नीटसे जमत नाही. खूप प्रयत्न करुनही कारल्याची भाजी कडूच लागते. अशावेळी रुचकर आणि चटपटीत भाजी कशी करावी, असा प्रश्न पडतो. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. फक्त भाजी बनवण्यापूर्वी काही मिनिटे आधी या टिप्स तुम्हाला वापरायच्या आहेत. पण मुलंदेखील कारल्याची भाजी मिटक्या मारत खातील. 

कारल्याचा कडवटपणा दूर करण्याचा सगळ्यात चांगला पर्याय आहे तो म्हणजे मीठ. यासाठी तुम्हाला कारले दोन भागांमध्ये कापून घ्यायचे आहे. त्यानंतर एका भांड्यात मीठ घेऊन त्यात कारले चोळून घ्या. त्यानंतर एका भांड्यात मीठ लावलेले कारले ठेवून द्या. वीस ते 30 मिनिटे कारली अशीच ठेवून द्या. त्यानंतर त्याची भाजी करण्यापूर्वी कारल्याचा रस पूर्णपणे पिळून घ्या. रस पिळून घेल्यानंतर मगच कारल्याची भाजी करा. 

तसंच, मीठाच्या पाण्यात काही मिनिटे कारले उकळून घेतल्यानंतरही कडवटपणा दूर होईल. किंवा कारल्याची भाजी कापून झाल्यानंतर मीठाच्या पाण्यात भिजवून ठेवून द्या. त्यानेही कडवटपणा दूर होतो. 

दह्यात घोळवून घ्या 

कारल्याचा कडवटपणा दूर करण्यासाठी आणखी एक टिप्स आहे. कारल्याची भाजी शिजवण्यापूर्वी काही वेळ दह्यात भिजवून ठेवा. हा पर्याय फार कमीवेळा वापरला जातो. पण ही टिप्स फारच फायदेशीर आहे. यासाठी कारल्याची भाजी करण्यापूर्वी जवळपास एक तास आधी कापून दह्यात डिप करुन ठेवा. त्यानंतर शिजवण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने कारले धुवून घ्या. 

कारल्याचा कडवटपणा हा त्याच्या बाहेरच्या सालांमुळं येतो. त्यामुळं भाजी बनवण्यापूर्वी कारले सोलून सालं काढूने घ्या. जेणेकरुन काही प्रमाणात कारल्यांचा कडवटपणा कमी होईल. मात्र कारल्याची सालं काढताना लक्षात घ्या की आपल्याला काही प्रमाणातच साले काढायची आहेत. अन्यथा त्यातील सर्व पोषण तत्वे कमी होतील. 

कारल्याचा कडुपणा कमी करण्यासाठी तुम्ही व्हिनेगरचा वापरही करु शकता. यासाठी आधी कराल्याची छोटे छोटे काप करुन घ्या, त्यानंतर त्यात साखर आणि व्हिनेगर याचे मिश्रण टाका. 10 ते 15 मिनिटे असंच ठेवून द्या. त्यानंतर कारले शिजवण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने साफ करुन घ्या. यामुळं कारल्याची नॅचरल टेस्ट खराब होत नाही तसंच, कडवटपणाही निघून जातो. 

Read More