Marathi News> हेल्थ
Advertisement

जान्हवी कपूरला MDI चा त्रास, हाताने काम करणं झालं होतं कठीण, काय आहे हा आजार

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा मल्टी डायरेक्शनल इंस्टाबिलिटीचा त्रास, MDI म्हणजे काय?

जान्हवी कपूरला MDI चा त्रास, हाताने काम करणं झालं होतं कठीण, काय आहे हा आजार

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा सिनेमा दरम्यान एक अपघात झाला होता. मिस्टर ऍण्ड मिसेस माही सिनेमाच्या शुटिंग दरम्यान खांद्याला दुखापत झाली. यामुळे तिला मल्टी डायरेक्शन इंस्टाबिलिटीचा त्रास झाला होता. या आजारपणामुळे जान्हवीला अक्षरशः पुस्तकाचे पान हलवणे देखील कठीण झाले होते. एका मुलाखती दरम्यान सांगितले की, जान्हवीला MDI चा त्रास झाला. खांद्यापासून मल्टीपल टोर्न लिगामेंट्सची समस्या निर्माण झाली. 

मल्टी डायरेक्शनल इंस्टाबिलिटी म्हणजे काय?

मल्टी डायरेक्शनल इंस्टाबिलिटीचा त्रास हा खांद्यावर परिणाम करणारा एक प्रकारचा त्रास आहे. दुखापत आहे. या स्थितीत खांदे पुढे वाकू लागतात. जेव्हा लिगामेंट्स कमकुवत होऊ लागतात तेव्हा खांदे खालच्या दिशेने वाकू लागतात. अनेक वेळा खांदा इतका वाकतो की तो शरीरापासून वेगळा दिसतो. तज्ज्ञांच्या मते, जेव्हा एखाद्याला विजेचा झटका दिला जातो किंवा त्याला अपस्माराचे झटके येतात तेव्हा ही समस्या उद्भवते. अशा परिस्थितीत, खांद्याचे सॉकेट सैल होऊ लागतात ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.

मल्टी डायरेक्शनल अस्थिरतेची लक्षणे काय आहेत?

  • एमडीआयच्या बाबतीत, रुग्णांना खांद्यामध्ये दुखणे आणि मुंग्या येणे जाणवू शकते.
  • खांद्याशी संबंधित कोणतेही काम करताना तुम्हाला तुमच्या खांद्यामध्ये वेदना जाणवू शकतात.
  • प्रचंड थकवा जाणवतो.
  • फक्त खांदे हलवण्यातच अडचण येत नाही.
  • तर काही तळहातांना धरण्यातही अडचण येऊ शकते.

मल्टी डायरेक्शनची ट्रिटमेंट कशी करावी?

  • मल्टी डायरेक्शन उद्भवलेल्या अत्यंत गंभीर प्रकरणांमध्येच शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते. त्याचवेळी, फिजिओथेरपी आणि विशेष व्यायामाच्या मदतीने रुग्णावर उपचार केले जाऊ शकतात.
  • रुग्णांना खांद्यावर ब्रेस वापरण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.
  • कफ स्नायू सक्रिय करण्यासाठी व्यायाम आणि उपचारांची मदत घेतली जाऊ शकते. यामुळे रुग्णाला आराम मिळतो.
  • कधीकधी, काही गंभीर प्रकरणांमध्ये, अधिक गुंतागुंत असल्यास शस्त्रक्रिया उपचार आवश्यक असू शकतात.

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Read More