Marathi News> हेल्थ
Advertisement

चहा सोबत तुम्हीही बिस्कीटे खाता का? तर आताच व्हा सावधान

भारतात चहा प्रेमींची कमतरता नाही, बहुतेक लोक चहाने दिवसाची सुरुवात करतात, पण चहासोबत गोड बिस्किटे खाणे आरोग्यास हानिकारक ठरु शकते.

चहा सोबत तुम्हीही बिस्कीटे खाता का? तर आताच व्हा सावधान

मुंबई : जर तुम्हाला देखील चहासोबत गोड बिस्किटे खाण्याची सवय असेल तर साधव व्हा. कारण यापासून होणारे दुष्परिणाम देखील तुम्हाला माहित हवे. बहुतेक लोकांसाठी, बिस्किट खाणे त्यांच्या रोजच्या आहाराचा एक भाग आहे, परंतु तज्ञांच्या मते, यामुळे तुमचे आरोग्य देखील बिघडू शकते.

चहासोबत गोड बिस्किटे खाण्याचे तोटे

1. लठ्ठपणा वाढतो

बिस्किटमध्ये हायड्रोजनेटेड फॅट्सचे प्रमाण असते. बिस्किट हे फॅट फ्री नसतात, त्यामुळे जर तुम्ही रोजत बिस्कीटे खात असाल तर यामुळे लठ्ठपणा वाढू शकतो. तुम्हाला यामुळे त्वचेच्या समस्या देखील उद्भवू शकतात.

 2. रक्तातील साखरेचं प्रमाण वाढते

चहासोबत गोड बिस्किटे जास्त दिवस खाण्याची सवय रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते. यात सोडियमचे प्रमाणही जास्त असते. मधुमेह आणि थायरॉईडच्या रुग्णांनी बिस्किटांचे सेवन करू नये.

3. प्रतिकारशक्ती कमकुवत होते

बिस्किटमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने रोगप्रतिकारशक्तीही कमी होऊ शकते. कोरोनानंतर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर विशेष भर दिला जात आहे.

4. बद्धकोष्ठता

बिस्किट हे मैद्यापासून बनवले जातात. त्यात फायबरचे प्रमाण नसते. ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. बीएचए आणि बीएचटी नावाचे दोन प्र‍िजर्वेट‍िव बिस्किटे किंवा कुकीजमध्ये टाकले जातात. यामुळे तुमच्या आरोग्यालाही हानी पोहोचते.

5. दात किडणे

बिस्किटात साखरेचे प्रमाण जास्त असते. जेव्हा तुम्ही ते रोज खातात तेव्हा ते दातांच्या इनॅमलला नुकसान पोहोचवते. त्यामुळे दातांमध्ये पोकळी निर्माण होऊन दात खराब होऊ शकतात.

Read More