Marathi News> हेल्थ
Advertisement

बिअरसोबत या गोष्टी खाणं चुकीचं; यामुळेच उद्भवतात डोकेदुखी, डिहायड्रेशन सारख्या समस्या

चुकीचे अन्न आणि अल्कोहोल यांचे मिश्रण पोषक तत्वांचे शोषण रोखू शकते.  चुकीच्या गोष्टींचे सेवन केल्याने पोटात ऍसिड रिफ्लक्स आणि सूज येऊ शकते.

बिअरसोबत या गोष्टी खाणं चुकीचं; यामुळेच उद्भवतात डोकेदुखी, डिहायड्रेशन सारख्या समस्या

मुंबई : बिअर पिणे ही एक सामान्य गोष्ट आहे आणि तरुणांमध्ये हा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. आजकाल दारुशिवाय कोणतीही पार्टी पूर्ण मानली जात नाही. वास्तविक बिअर पिणे हा आधुनिक जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग मानला जाऊ लागला आहे. तुम्ही दारु पित असाल, तरच तुम्ही पुढारलेले असा देखील अनेक लोकांना संभ्राम झाला आहे. यासगळ्या बिअरचा खपही वाढला आहे. तसेच असे ही बोलले जाते की, बिअर ही अल्कोहोलपेक्षा कमी मादक आहे आणि थंडगार बिअर उष्णतेपासून आराम देखील देते.

बहुतांश लोक बिअरसोबत अनेक पदार्थ खातात हे अनेकदा पाहायला मिळाले आहे. पार्ट्यांमध्ये लोकं बिअरसोबत पिझ्झा, चिकन, नमकीन पकोडे, ड्रायफ्रूट्स इत्यादी खातात. परंतु तुम्हाला माहिती आहे का? की असं करणं आरोग्यासाठी चांगले नाही.

लोकांचा असा समज आहे की, बिअरसोबत अशा मसालेदार पदार्थ खाल्ल्याने चव आणि आनंद अधिक वाढतो, असे मानले जाते. अर्थात हे खरे आहे, पण तुम्हाला माहित आहे का की बिअरसोबत अशा मसालेदार पदार्थांचे सेवन करणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

चुकीचे अन्न आणि अल्कोहोल यांचे मिश्रण पोषक तत्वांचे शोषण रोखू शकते. इतकेच नाही तर बिअर किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या अल्कोहोलसोबत चुकीच्या गोष्टींचे सेवन केल्याने पोटात ऍसिड रिफ्लक्स आणि सूज येऊ शकते.

बिअर किंवा वाईन पिण्याचे काही नियम आहेत, उदाहरणार्थ, शास्त्रज्ञांचे असे मत आहे की, वाइन किंवा बिअरचे मर्यादित प्रमाणात सेवन केल्याने शरीर तंदुरुस्त राहते. त्याचप्रमाणे रिकाम्या पोटी अल्कोहोल पिणे किंवा चुकीच्या अन्नपदार्थांसह सेवन केल्याने तुम्ही आजारी पडू शकता. ज्यामुळे तुम्हाला डोकेदुखी देखील होऊ शकते.

बिअर पिताना तुम्ही त्यासोबत ब्रेड किंवा बेक केलेल्या कोणत्याही वस्तूचे सेवन करू नये. कारण दोन्ही गोष्टींमध्ये यीस्ट असते आणि तुमचे पोट एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात यीस्ट पचवू शकत नाही. ज्यामुळे तुम्हाला पचन समस्या किंवा Candida च्या अतिवृद्धीची समस्या उद्भवू शकते.

बर्गर किंवा फ्रेंच फ्राइज

पुढच्या वेळी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बिअर पिण्याची योजना आखाल, तेव्हा तुम्ही त्यासोबत फ्रेंच फ्राईज सारख्या गोष्टी खाणार नाही याची खात्री करा. खारट स्नॅक्समध्ये जास्त प्रमाणात सोडियम असते, जे तुम्ही अल्कोहोल पिता तेव्हा तुमच्या पचनसंस्थेसाठी वाईट असू शकते.

खारट गोष्टी तुमची तहान वाढवू शकतात, ज्यामुळे तुम्ही जास्त पिता. शिवाय, बिअरमध्ये लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ प्रभाव असतो ज्यामुळे तुम्हाला जास्त वेळा लघवीला होऊन तुमच्या शरीरातील पाणी कमी होऊ शकते.

मसालेदार वस्तु

बिअरसोबत मसालेदार पदार्थ खायला आपल्याला फार आनंद मिळतो पण, यामुळे तुमच्या आरोग्याशीही खेळ होऊ शकतो. मसालेदार पदार्थांमध्ये कॅप्सेसिन असते, ज्यामुळे पोटात जळजळ आणि इतर समस्या उद्भवू शकतात. कोणत्याही परिस्थितीत बिअर सोबत या गोष्टी करणं टाळा.

खारट वस्तु

अनेकांना खारे शेंगदाणे, ड्रायफ्रुट्स किंवा बिअरसोबत इतर स्नॅक्स खायला आवडतात. या गोष्टींमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे तुम्हाला डिहायड्रेशन होऊ शकते. इतकंच नाही तर हे मिश्रण तुम्हाला सूज आणि रक्तदाबाचा धोकाही वाढवू शकतात.

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेटचे आरोग्यासाठी स्वतःचे फायदे आहेत, परंतु ते बिअरसोबत खाल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. इतर अम्लीय पदार्थांप्रमाणे, चॉकलेटमध्ये कॅफीन, चरबी आणि कोको असतात. बिअरसोबत याचे सेवन केल्याने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या उद्भवू शकतात.

Read More