Marathi News> हेल्थ
Advertisement

कुत्रा चावल्यानंतर त्रास कमी करण्यासाठी '3' नैसर्गिक उपाय ठरणार फायदेशीर

आजकाल अनेक सोसायट्यांमध्ये भटक्या आणि मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. 

कुत्रा चावल्यानंतर त्रास कमी करण्यासाठी '3' नैसर्गिक उपाय ठरणार फायदेशीर

मुंबई : आजकाल अनेक सोसायट्यांमध्ये भटक्या आणि मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. रोगट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा नवख्या लोकांना अंदाज येत नाही. परिणामी अचानक हिंसक झालेले कुत्रे हल्ले करू शकतात. 

अचानक कुत्र्याचा हल्ला होणं, कुत्रा चावा घेणं आरोग्याला जीवघेणं ठरू शकते. अनेकदा कुत्रा चावत नसला तरिही त्याचं नख, दात लागणंही आरोग्याला धोकादायक ठरू शकते. कुत्र्याशी झटापट झाल्यानंतर अ‍ॅन्टी टिटॅनस आणि अ‍ॅन्टी रेबिज इंजेक्शन दिली जातात. यासोबतीने काही नैसर्गिक उपायही फायदेशीर ठरतात. कुत्रा चावल्यानंतर या '4' गोष्टी ताबडतोब करा ..

कडूलिंब - 

कुत्रा चावल्यानंतर कडूलिंबाचा पाला लावणं फायदेशीर आहे. जखम भरून निघण्यास कडुलिंबाचा पाला फायदेशीर ठरतो. त्यामधील अ‍ॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म कुत्रा चावल्यानंतर होणारी जखम ठीक करण्यास मदत करते. कडूलिंबाची पानं बारीक वाटा. त्यामध्ये कोरफडीचा गर मिसळा. ही पेस्ट जखमेवर लावा. 

लसूण - 

लसणातील अ‍ॅन्टीबॅक्टेरियल घटक कुत्रा चावल्यानंतर होणारा त्रास कमी करण्यास फायदेशीर आहे. लसणामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.  लसूण ठेचून खोबरेल तेलात मिसळा. जखमेवर हे मिश्रण लावा. 

जिरं - 

जिर्‍यामध्ये बॅक्टेरियाशी सामना करण्याची आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची क्षमता आहे. जिरं आणि पाणी एकत्र करून पेस्ट बनवा. जखमेवर ही पेस्ट लावा. 

Read More