Marathi News> हेल्थ
Advertisement

Kitchen Hacks: मिक्सरमध्ये 2 मिनिटांत भिजवा कणिक, चपात्या होतील मऊ आणि लुसलुशीत, पाहा VIDEO

Kitchen Hacks: मिक्सरच्या भांड्यात गव्हाचे पीठ कसे भिजवाल? तुम्हालाही हा प्रश्न पडलाय ना. वाचा ही भन्नाट टिप्स  

Kitchen Hacks: मिक्सरमध्ये 2 मिनिटांत भिजवा कणिक, चपात्या होतील मऊ आणि लुसलुशीत, पाहा VIDEO

Roti Dough Using Mixer Kitchen Hacks in Marathi: ऑफिसच्या घाई गडबडीत सकाळी उठून कणिक भिजवणे, चपात्या करणे हे अगदी अवघड होऊन जाते. ऑफिसला जाण्याच्या गडबडीत असताना कधी कधी कणिक सैलसर मळले जाते तर कधी घट्ट होते. अशावेळी चपात्या करायला कठिण जाते. जेवणात चपात्या हा मुख्य पदार्थ असल्यामुळं चपात्या करणे गरजेचं असतं. मात्र कणिक नीट मळलं गेलं नाही तर कधी चपात्या वातड किंवा कडक लाटल्या जातात. अशा चपात्या डब्यात नेल्यानंतर किंवा दुपारच्या जेवणासाठी खाताना त्या कडक होतात. त्यामुळंच आम्ही तुमच्यासाठी एक भन्नाट किचन टिप घेऊन आलो आहोत.  

पीठ मळणे ही वेळखाऊ प्रक्रिया आहे. पण मऊ, लुसलुशीत चपात्या बनवण्यासाठी कणिक योग्य पद्धतीने भिजवावी लागते. वेळेची बचत करण्यासाठी काही जण फूड प्रोसेसर किंवा मशीनचा वापर करतात. यात 5 मिनिटांत पीठ मळून तयार होते. पण या मशीन खूप महाग असतात. सगळ्यांनाच ते घेणे परवडत नाही. त्या ऐवजी मिक्सरच्या सहाय्याने तुम्ही पीठ मळू शकता. मिक्सरचा वापर करुन कणिक नेमकी कशी मळावी याची सोपी टिप्स पाहूयात. 

- मिक्सरमध्ये कणिक मळण्यासाठी सगळ्यातआधी मोठे भांडे घ्यावे. 

- या भांड्यात तुम्हाला जितके हवे तितके गव्हाचे पीठ टाकावे

- तुमच्या अंदाजानुसार त्या पिठात गरजेनुसार पाणी व तेल टाकावे

- त्यानंतर मिक्सरचे झाकण लावून मिक्सर सुरू करावा

- मिक्सर सुरुवातीलाच जोरात फिरवू नये. सुरुवातीला हळूहळू मिक्सर फिरवून घ्यावा मग त्याचा वेग वाढवावा

- मिक्सरच्या भांड्यात हळूहळू पिठाचा गोळा तयार होईल. त्यात गरज असल्यास पाणी घाला

- पीठ एकत्रित होऊन त्याचा गोळा तयार होताना दिसेल. पूर्णपणे मळून झाल्यानंतर त्याला मिक्सरमधून बाहेर काढा

- या तयार कणकेचे छोटे गोळे करुन चपात्या लाटून घ्याव्यात. 

Read More