Marathi News> हेल्थ
Advertisement

डोळ्यांचा लालसरपणा कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय

गुलाबपाणी आहरात जसं फायदेशीर आहे तसेच त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठीही त्याचा वापर केला जातो. 

डोळ्यांचा लालसरपणा कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय
Updated: Aug 20, 2018, 02:05 PM IST

मुंबई : गुलाबपाणी आहरात जसं फायदेशीर आहे तसेच त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठीही त्याचा वापर केला जातो. डोळ्यांच्या आरोग्यासाठीही गुलाबपाणी फायदेशीर आहे. त्वचा मुलायम करण्यासाठी गुलाबपाणी अत्यंत फायदेशीर आहे. दाहशामक गुणधर्म असल्याने डोळ्यातील सूज, जळजळ कमी करण्यासाठी त्याचा वापर होतो. 

डोळ्यांमध्ये गुलाबपाण्याचे काही थेंब घाला. यासोबतच तुम्ही कापसाच्या बोळ्यावर गुलाबपाण्याचे काही थेंब घेऊन तो भिजवा. 15 मिनिटांसाठी हा कापसाचा गोळा ठेवल्याने आराम मिळू शकतो. 

टी बॅग्स 

डोळ्यांच्या आरोग्यासाठी टी बॅग्सदेखील फायदेशीर आहेत. त्यामुळे टी बॅग्स वापरल्यानंतर फेकून देऊ नका. डोळ्यांचा आरोग्यासाठी ते वापरू शकता. त्यामधील बायो फ्लेवोनाइड्स घटक डोळ्यांचा लालसारपणा कमी करण्यास मदत करतो. वापरण्यापूर्वी 30 मिनिटं बॅग्स फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर डोळ्यावर ठेवा. 

काकडी 

काकडी नैसर्गिकरित्या थंड असल्याने डोळ्यातील जळजळ कमी करण्यासाठी मदत होते.  रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत करण्यासाठी मदत होते. 

कोरफड 

चमचाभर कोरफड आणि पाणी एकत्र करा. हे मिश्रण काहीवेळ फ्रीजमध्ये ठेवा. कापसाच्या बोळ्यावर हे मिश्रण ठेवून डोळ्यांवर ठेवा. यामुळे त्रास कमी होण्यास मदत होते. 

पाणी  

धूर, धूळ यामुळे डोळ्यांना त्रास होत असल्यास ते चोळू नका. यामुळे त्रास अधिक वाढू शकतो. अशावेळेस डोळ्यावर पाण्याचे हबके मारा.