Marathi News> हेल्थ
Advertisement

हृद्याच्या ठोकयातील अनियमितता टाळण्यासाठी नैसर्गिक उपाय

हृद्याच्या ठोक्यांमध्ये अनियमितता निर्माण झाली की आपोआपच त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही दिसून येते. हृद्याचे ठोके अति वेगाने पडणे, कमी होणे किंवा त्यामध्ये अनियमितता निर्माण होणं हे आरोग्याला धोकादायक आहे. 

हृद्याच्या ठोकयातील अनियमितता टाळण्यासाठी नैसर्गिक उपाय

मुंबई : हृद्याच्या ठोक्यांमध्ये अनियमितता निर्माण झाली की आपोआपच त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही दिसून येते. हृद्याचे ठोके अति वेगाने पडणे, कमी होणे किंवा त्यामध्ये अनियमितता निर्माण होणं हे आरोग्याला धोकादायक आहे. 

हृद्याच्या ठोक्याचे अनियमितचे प्रकार -  

हृद्याचे ठोके कमी होणे - Bradycardia
हृद्याचे ठोके वाढणे - Tachycardia
अनियमित हार्टबीट्स - fibrillation
अर्ली हार्टबीट्स - प्रिमॅच्युअर ठोके पडणं 

हृद्याच्या ठोक्यामध्ये अनियमितता वाढण्यामागे अनेक कारणं असू शकतात. तणावग्रस्त जीवनशैली, मधुमेह, हायपरटेंशन, (उच्च रक्तदाब), स्मोकिंग, कॉफीचे अतिसेवन यामुळे हृद्याचे कार्य बिघडते. अशा समस्या जीवावर बेतण्यापूर्वीच काही लाईफस्टाईलमधील बदलांद्वारा बदल करून त्याचा धोका कमी करता येऊ शक्तो.  

आहारात सकारात्मक बदल - 

दाहशामक पदार्थांचा आहारात समावेश केल्याने या समस्येवर मात करता येऊ शकते. अ‍ॅन्टीऑक्सिडंट, फायटोन्युट्रिएंट युक्त पदार्थांचा समावेश करणं आवश्यक आहे. 

व्यायाम -  

हृद्याचे आरोग्य जपण्यासाठी काही फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी म्हणजेच व्यायाम करणं आवश्यक आहे. मात्र याकरिता तज्ञांचा सल्ल्यानुसारच व्यायाम ठरवणं आवश्यक आहे. 

धुम्रपान, मदयपान टाळा-

व्यसनामुळे हृद्याच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यायाम, योगासनं, ध्यान याद्वारा वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा. आहारात तळकट, मसालेदार पदार्थ टाळा. 

घरगुती मसाज - 

हृद्याचं आरोग्य जपण्यासाठी नियमित चेकअप करणं आवश्यक आहे. वैद्यकीय चाचण्यांशिवाय सेल्फ मेडिकेशन म्हणजेच मनाने औषध घेणं टाळा.याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. 

Read More