Marathi News> हेल्थ
Advertisement

निद्रानाशाची समस्या अवघ्या 10 मिनिटात दूर करेल 'हा' रामबाण ज्यूस!

आजकाल ताणतणाव हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. 

निद्रानाशाची समस्या अवघ्या 10 मिनिटात दूर करेल 'हा' रामबाण ज्यूस!

मुंबई : आजकाल ताणतणाव हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरदेखील होत आहे. त्यामुळे वजन वाढणं, लठ्ठपणा, निद्रानाश अशा समस्यांना आमंत्रण मिळते आणि यामधूनच काही गंभीर आजार बळावण्याची शक्यता असते. 

निद्रानाश ही समस्या लहानशी वाटत असली तरीही त्यामधून लाईफस्टाईशी निगडीत अनेक समस्या उद्भवण्याचा धोका असतो. अशावेळेस झोप येण्यासाठी औषधगोळ्यांची मदत घेण्यापेक्षा काही नैसर्गिक उपयांनीही मात करता येऊ शकते. चेरीचा ज्यूस निद्रानाशाच्या समस्येमध्ये परिणामकारक ठरतो. 

अवघ्या 10 मिनिटांत येईल झोप 

लुईसियाना स्टेट युनिव्हर्सिटीने 8 निद्रानाशाची समस्या असणार्‍यांवर एक प्रयोग केला. काही लोकांना placebo ड्र्ग्ज देण्यात आले तर काहींना चेरीचा ज्यूस देण्यात आला. चेरी ज्युस प्यायलेल्यांमध्ये स्लीप टाईम हा 84 मिनिट वाढला होता.  

कसा करतात परिणाम ? 

चेरीमध्ये नैसर्गिक स्वरूपात प्लांट कम्पाउंड असतात. याला  proanthocyanidins असेही म्हणतात. यामुळे शरीरात झोपेसाठी आवश्यक असणार्‍या सेरोटॉनिन हार्मोन्सला चालना दिली जाते. या नॅचरोट्रान्समीटरमुळे शरीर आरामदायी स्थिती अनुभवण्यासाठी तयार होते. 

कोणत्या गोष्टींचं भान राखाल ?

चेरीचा ज्यूस पिताना त्यामध्ये साखर मिसळू नका. साखर मिसळल्यास तुम्हांला अपेक्षित परिणाम मिळू शकणार नाही. रात्री वेळेत झोप येण्यासाठी आहाराचं पथ्यपाणी सांभाळणंदेखील गरजेचे आहे. रात्री भरपेट जेवणं टाळा. 

रात्री झोपण्याची वेळ सतत बदलू नका. शरीराला एका ठराविक वेळेची सवय लावा. 

रात्रीच्या वेळेस चहा, कॉफीसारखी कॅफिनयुक्त पेय टाळा. निद्रानाश हे पदार्थ खाल्ल्याने दूर करता येऊ शकतो

Read More