Marathi News> हेल्थ
Advertisement

काळवंडलेले ओठ पुन्हा तजेलदार करण्यासाठी '4' नैसर्गिक उपाय

पाणी कमी पिणे, स्मोकिंग अशा सवयींमुळे ओठ काळसर होण्याची शक्यता अधिक असते. 

काळवंडलेले ओठ पुन्हा तजेलदार करण्यासाठी '4' नैसर्गिक उपाय

मुंबई : पाणी कमी पिणे, स्मोकिंग अशा सवयींमुळे ओठ काळसर होण्याची शक्यता अधिक असते. अनेकदा ओठांवर काळी त्वचा जमा होते. यामुळे सौंदर्य खराब होण्याची शक्यता बळावते. मुली अनेकदा लिपस्टिक लावून काळवंडलेले ओठ लपवण्याचा प्रयत्न करतात. मात्र पुरूषांना पर्याय काय? हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर ओठांना मऊ आणि तजेलदार ठेवण्यासाठी काय पर्याय आहे हे नक्की जाणून घ्या. 

बदामाचं तेल 

रात्री झोपण्यापूर्वी ओठांना बदामाचं तेल लावा. यामुळे ओठांना नैसर्गिकरित्या गुलाबी ठेवण्यासाठी मदत होते. तेलाच्या 2- 4 थेंबाचा मसाज केल्याने ओठ मुलायम होतात. सकाळी उठल्यावर स्वच्छ धुवावेत. 

लिंबाचा रस 

लिंबाचा रस चेहरा उजळवण्यासाठीदेखील फायदेशीर आहे. यामुळे मुरूमांमुळे चेहर्‍यावरील डाग दूर करण्यास, टॅनिंगचा त्रास कमी करण्यास मदत करते. ओठांवर लिंबाचा रस लावल्यास काळसरपणा दूर होतो. आठवड्यात नियमित 2-3 वेळेस ओठांवर लिंबाच्या रसाचा मसाज केल्याने ते उजळण्यास मदत होते. लिंबाची साल ओठांवर नियमित घासल्यानेही ओठांवरील त्वचा मॉईश्चरराईज राहण्यास मदत होते. 

मध  

मधामुळे सौंदर्य खुलवण्यास मदत होते. सोबतच ओठांचा काळसरपणा कमी करण्यास मदत होते. नियमित मधाचा मसाज करा. रात्री झोपण्यापूर्वीदेखील मधाचे काही थेंब ओठांवर लावा. सकाळी ओठ पाण्याने स्वच्छ धुवावेत. नियमित 5-6 दिवस असे केल्याने ओठ तजेलदार होण्यास मदत होते. 

बीट 

बीटाचा रस शरीरात रक्त वाढवण्यास मदत करतात. सोबतच त्याचा लाल रंग़ ओठाचे सौंदर्य खुलवण्यास मदत करते.आठवड्यात 2-3 वेळेस ओठांना बीटाच्या तुकड्याने मसाज करा. यामुळे नैसर्गिकरित्या ओठांना लालसरपणा मिळतो. 

Read More