Marathi News> हेल्थ
Advertisement

तुमची मान काळी झाली आहे? 'हे' उपाय करा

मानेवरचा काळा घेर काढायचा आहे? जाणून घ्या घरगूती उपाय 

तुमची मान काळी झाली आहे? 'हे' उपाय करा

मुंबई :  अनेकदा अनेकांच्या मानेचा भाग काळा असतो, तर इतर भाग गोरा असतो. त्यामुळे नुसती काळी मान पाहिली की खुपच वाईट वाटतं. अनेकदा आपण अंघोळ करताना हा मळ काढायचा प्रयत्न करतो, पण मळ काही निघत नाही. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगत आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमची काळी मान उजळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया काळी मान साफ​करण्यासाठीचे घरगुती उपाय. 

काळी मान साफ करण्यासाठी तुम्ही 1 चमचे तुरटी पावडर, 1 चमचे गुलाबजल, 1 ते 2 चमचे लिंबाचा रस समान प्रमाणात मिसळून पेस्ट तयार करू शकता, आणि 15 ते 20 मिनिटे मानेवर ठेवू शकता. त्यामुळे बऱ्याच अंशी दिलासा मिळेल. हे मिश्रण लावल्यानंतर तुम्ही तुमची मान स्वच्छ पाण्याने धुवा. साबण न वापरण्याची काळजी घ्या.

या पेस्टशिवाय तुम्ही तुरटीमध्ये बेकिंग सोडा आणि गुलाबपाणी मिक्स करू शकता. यामुळे मानेचा काळेपणाही दूर होतो.

कोरफड आणि मुलतानी मातीच्या सहाय्यानेही देखील तुम्ही तुमची मान चमकदार बनवू शकता. तुम्हाला फक्त मुलतानी माती, एलोवेरा जेल आणि गुलाबपाणी एकत्र करून त्या जागेवर लावायचे आहे. नंतर पॅक सुकल्यावर कोमट पाण्याने धुवा.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read More