Marathi News> हेल्थ
Advertisement

लॉबस्टर (करपाली, शेवंडी) तुम्ही कधी खाल्लंय का?

तुम्ही अनेक प्रकारचे मासे खाल्ले असतील पण तुम्ही कधी लॉबस्टर खाल्लंय का? लॉबस्टरला मराठीत करपाली किंवा

लॉबस्टर (करपाली, शेवंडी) तुम्ही कधी खाल्लंय का?

मुंबई : तुम्ही अनेक प्रकारचे मासे खाल्ले असतील पण तुम्ही कधी लॉबस्टर खाल्लंय का? लॉबस्टरला मराठीत करपाली किंवा शेवंडी, शेवंड मासाही म्हणतात. पहिल्यांदा तुम्ही लॉबस्टर पाहाल तर याला खातात का आणि खायचं कसं असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडेल.

लॉबस्टरमध्ये भरपूर कॅल्शियम, फॉस्फरस, कोलीन, व्हिटॅमिन बी 12, नियासिन, सेलेनियम आणि हायड्रॉक्सीपाटाइट असतं. म्हणून अनेकवेळा लॉबस्टर शिजवताना त्यांचा रंग बदलतो असं म्हणतात.

लॉबस्टर खूप महागात मिळतो, पनवेलजवळ उल्वे गावाच्या बाहेर, उल्वे गावठाणजवळ गावातील काही महिला सायंकाळी लॉबस्टर विक्रीसाठी आणतात. काही तासातच लॉबस्टर विकले जातात. एवढंच नाही तर त्यांच्याकडे चांगल्या प्रकारचे खेकडेही असतात. 

लॉबस्टर नेमका कसा कापला जातो तो तुम्ही या व्हिडीओतच पाहा कारण अनेक वेळा लॉबस्टर घरी आणल्यानंतर कापायचा कसा हा देखील प्रश्न असतो. मस्यप्रेमींसाठी लॉबस्टर हा आणखी एक चांगला पर्याय आहे.

Read More