Marathi News> हेल्थ
Advertisement

FOS लहान मुलांसाठी किती फायदेशीर? पाहा तज्ज्ञ काय म्हणतायत!

FOS : फ्रुक्टोलिगोसाकराइड्स (Fructooligosaccharides) ही न पचणारी कर्बोदके असतात. एफओएससारखी प्रीबायोटिक्स लहान बाळांच्या जठर व आतड्यांसाठी लाभदायक ठरतात.

FOS लहान मुलांसाठी किती फायदेशीर? पाहा तज्ज्ञ काय म्हणतायत!

FOS : बायफिडोजेनिक ऑलिगोसॅकराइड्सचा एक प्रमुख वर्ग असलेली, फ्रुक्टोलिगोसाकराइड्स (Fructooligosaccharides) ही न पचणारी कर्बोदके असतात. फ्रक्टन्स, ऑलिगोफ्रुक्टन्स किंवा ऑलिगोफ्रुक्टोज अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाणारी ही कर्बोदके केळी, सफरचंद, मध, चिकोरीचे मूळ, आर्टिचोक इत्यादींमध्ये निसर्गतः असतात. 

संशोधनातून असं आढळून आलंय की, एफओएससारखी प्रीबायोटिक्स लहान बाळांच्या जठर व आतड्यांसाठी लाभदायक ठरतात. इतकंच नव्हे तर, हृदय व रक्तवाहिन्या, मानसिक आरोग्य आणि हाडं यांच्या आरोग्यासाठी देखील त्यांचे अनेक दीर्घकालीन लाभ मिळतात. एफओएसमुळे आतड्यांमध्ये सूक्ष्म जीवांच्या क्रियाशीलतेला मिळणारं प्रोत्साहन हे या लाभदायक प्रभावांमागचे कारण आहे.

एफओएस शरीराच्या आत गेल्यावर जसं आहे त्या स्थितीत लहान आतड्यामधून सिकममध्ये (मोठ्या आतड्याच्या सुरुवातीला असलेला बंद थैलीसारखा भाग) प्रवेश करतं. याठिकाणी एफओएसवर बॅक्टेरियल हायड्रोलिसिस ही प्रक्रिया होते, ज्यामुळे एसीटेट, ब्युटायरेट, प्रोपियोनेट, एल-लॅक्टेट, कार्बन डायऑक्साइड आणि हायड्रोजन सोडले जातात. शॉर्ट चेन फॅटी ऍसिडमुळे कमी पीएच जीवाणूंच्या रोगजनक स्ट्रेनची वाढ रोखते तर लॅक्टोबॅसिली आणि बिफिडोबॅक्टेरिया या लाभकारी स्ट्रॅन्सची वाढ होते.

लहान बाळाच्या आतड्यामध्ये बायफिडोबॅक्टेरिया भरपूर प्रमाणात असतील तर ते बाळाचे आरोग्य चांगलं असल्याचं द्योतक आहे. बायफिडोबॅक्टेरियाची संख्या मुबलक असण्याबरोबरीनेच जर आतड्यामध्ये मायक्रोबायोटाचे वैविध्य कमी असेल तर बाळांचे आरोग्य चांगले राहते.

एफओएसमुळे जठर आणि आतड्यांना मिळणाऱ्या अनेक फायद्यांपैकी एक म्हणजे बद्धकोष्ठता कमी होते. एफओएसचे वारंवार सेवन केल्याने शौचाचे प्रमाण व वारंवारता वाढते, बायफिडोबॅक्टेरियाची संख्या वाढल्याने मल मऊ राहतं, स्टूल पोट्रेसेन्स कमी होऊन शौच होण्याच्या क्रियेतील हालचाली सुलभ होतात. 

6 एफओएसच्या सेवनामुळे आतड्यांमध्ये अनुकूल वातावरण निर्माण होण्यास मदत होते, ही बाब स्तनपान करणाऱ्या बाळांमध्ये विशेष करून दिसून येते. दररोज २.५ ते ५ ग्रॅम एफओएस ज्यांना दिले गेले अशा बाळांच्या बाबतीत तीन गोष्टी प्रकर्षाने आढळून आल्या - अतिसार कमी काळ टिकून राहतो, आतड्यामध्ये पुट्रेफेक्टिव्ह पदार्थ निर्माण होण्याचे प्रमाण कमी होते आणि मलाचा पीएच लक्षणीय प्रमाणात कमी होतो.  

1 लिटर ओरल रीहायड्रेटिंग सोल्यूशनमध्ये ०.३ ग्रॅम एफओएस आणि त्याच प्रमाणात झायलूलिगोसॅकॅराइड व 1 एमएमओएल झिंक मिसळल्यास कोणत्याही इतर औषधांची गरज न भासता अतिसार कमी वेळात बरा होतो. आतड्याच्या मायक्रोबायोटाच्या मॉड्युलेशनमुळे तीव्र गॅस्ट्रोएन्टेरिटिस (एजीई) ची तीव्रता कमी होते. एफओएस आतड्यांतील मायक्रोबायोटा वाढवते जे जीवनसत्त्वे आणि खनिज शोषण सुधारण्यास मदत करते. अशाप्रकारे, एफओएस हे बाळांसाठी व लहान मुलांसाठी फायदेशीर आणि सुरक्षित असल्याचं आढळून आलंय.

- डॉ. बी. मुरली संतोष, चीफ निओनॅटोलॉजिस्ट

Read More