Marathi News> हेल्थ
Advertisement

ओठांचे सौंदर्य राखण्यासाठी घरगुती उपाय

आपले ओठ अधिक सुंदर दिसावेत यासाठी महिला लिपस्टिकचा वापर करतात.

ओठांचे सौंदर्य राखण्यासाठी घरगुती उपाय

मुंबई : आपले ओठ अधिक सुंदर दिसावेत यासाठी महिला लिपस्टिकचा वापर करतात. मात्र, लिपस्टीकमध्ये असलेल्या केमीकल्समुळे ओठांवर याचा दुष्परीणाम होवून ओठ काळे पडतात. चेहऱ्याचे सौंदर्य ओठांवर अवलंबून असते आणि ओठांची त्वचा संवेदनशील असल्याने हवामानाचा ओठांवर लवकर प्रभाव दिसून येतो. त्यामुळे ओठांचे आरोग्य राखण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करा. 

- ओठांचा काळसरपणा दूर करण्यासाठी काकडीचा रस ओठांवर लावा. यामुळे काळसरपणा तर दूर होईल शिवाय ओठांचा ओलावाही वाढण्यास मदत होईल.

- साखर आणि मध प्रत्येकी एक चमका घ्यावे. यात आल्याचा एक तुकडा बारीक कापून टाकावा हे मिश्रण व्यवस्थीत मिसळुन जेलप्रमाणे नियमित ओठांना लावावे.

- लिपस्टिकच्या अती वापरामुळे ओठांचे नुकसान होते. यासाठी बीटरूटचा एक तुकडा, मसाज केल्यासारखा हळूवारपणे ओठावरून फिरवा. यामुळे ओठांचे आरोग्य टिकून सौंदर्यही वाढण्यास मदत होईल.

 

 

Read More