Marathi News> हेल्थ
Advertisement

मनगटाचं दुखणं पेनकिलर्सने नव्हे तर या '3' घरगुती उपायांंनी दूर करा

घाईगडबडीत एखादी जड वस्तू पटकन उचलल्यानंतर एखादी नकळत इजा होते. बर्‍याचदा हे तेव्हा जाणवत नाही. कालांतर हे दुखणं ठणकत राहतं. सूज येते. 

मनगटाचं दुखणं पेनकिलर्सने नव्हे तर या '3' घरगुती उपायांंनी दूर करा

मुंबई : घाईगडबडीत एखादी जड वस्तू पटकन उचलल्यानंतर एखादी नकळत इजा होते. बर्‍याचदा हे तेव्हा जाणवत नाही. कालांतर हे दुखणं ठणकत राहतं. सूज येते. 

मनगटाचं दुखणं कमी करण्यासाठी अनेकजण पेनकिलर्सची मदत घेतात. पण वारंवार पेनकिलर्स घेणंही आरोग्याला त्रासदायक ठरू शकतो. दुखणं फार तीव्र नसेल तर त्यावर काही घरगुती उपायही  करता येऊ शकतात. गरोदर स्त्रियांंनी पेनकिलर्स घेतल्यास बाळावर होतो 'हा' गंभीर परिणाम ...

मनगटाचं दुखणं कमी करण्यासाठी खास घरगुती उपाय 

#1 तेलचा मसाज 

तुमच्या मनगटाजवळ तीव्र वेदना जाणवत असल्यास दोन थेंब पुदीन्याच्या तेलामध्ये 6 थेंब मोहरीचं तेल मिसळा. या मिश्रणाने मालिश केल्याने वेदना कमी होण्यास मदत होते. 

#2 कोल्ड पॅक 

अनेकदा वेदनांसोबतच मनगटाजवळ वेदनाही जाणवतात. अशावेळेस बर्फाने शेकल्यास आराम मिळतो. यामुळे सुज कमी होण्यास मदत होते सोबतच वेदनाही कमी होतात.  

#3 गरम पाण्याचा शेक  

एका भांड्यात गरम पाणी, मीठ आणि मोहरीचं तेल मिसळा. या पाण्यामध्ये 10 मिनिटं हात बुडवून ठेवा. यामुळे मनगटाचं दुखणं कमी होण्यास मदत होते.  

Read More