Marathi News> हेल्थ
Advertisement

या उपायांनी मिळवा घामाच्या दुर्गंधीपासून सुटका

उन्हाळ्यात शरीरातून घाम येत असल्याने घामाच्या दुर्गंधीच्या समस्येचा त्रास साऱ्यांनाच होतो. अनेकदा अंडरआर्म्स, पाय, हाताचे तळव्यांमधून येणाऱ्या घामाच्या दुर्गंधीमुळे शरमेने मान खाली घालावी लागते. उन्हाळ्यात घाम येणं ही सामान्य बाब आहे. शरीरातून घाम बाहेर पडल्याने लठ्ठपणा कमी होतो तसेच अनेक आजारांपासून सुटका मिळते. खरंतर हा घामाला वास नसतो मात्र जेव्हा घाम त्वचेच्या वरील स्तरावर असलेल्या बॅक्टेरियामध्ये मिसळतो तेव्हा घामाला दुर्गंधी येते. 

या उपायांनी मिळवा घामाच्या दुर्गंधीपासून सुटका

मुंबई : उन्हाळ्यात शरीरातून घाम येत असल्याने घामाच्या दुर्गंधीच्या समस्येचा त्रास साऱ्यांनाच होतो. अनेकदा अंडरआर्म्स, पाय, हाताचे तळव्यांमधून येणाऱ्या घामाच्या दुर्गंधीमुळे शरमेने मान खाली घालावी लागते. उन्हाळ्यात घाम येणं ही सामान्य बाब आहे. शरीरातून घाम बाहेर पडल्याने लठ्ठपणा कमी होतो तसेच अनेक आजारांपासून सुटका मिळते. खरंतर हा घामाला वास नसतो मात्र जेव्हा घाम त्वचेच्या वरील स्तरावर असलेल्या बॅक्टेरियामध्ये मिसळतो तेव्हा घामाला दुर्गंधी येते. 

यावेळी लिंबू पाणी, गुलाबजल, दही, बेकिंग सोडा, ताजे पाणी या घरगुती उपायांनी ही दुर्गंधी रोखता येते. उन्हाळ्यात विशेषकरुन कॉटनचे कपडे घालण्याला प्राधान्य दिले पाहिजे. उन्हाळ्यात घामाची दुर्गंधी रोखण्यासाठी डिओचा वापर केला जातात. नेहमी सौम्य सुगंध असलेल्या डिओचा वापर करा. अन्यथा त्वचेवर याचा परिणाम होतो. त्वचेवर काळे डाग पडतात. 

बेकिंग सोडा घामापासून येणाऱ्या दुर्गंधीला रोखण्यासाठी रामबाण उपाय आहे. बेकिंग सोडा, पाणी आणि लिंबाचा रस मिसळून एकत्रित पेस्ट करा. ही पेस्ट अंडरआर्म्सला लावून १० मिनिटांनी साध्या पाण्यानी धुवा. यामुळे घामामुळे येणारी दुर्गंधी रोखली जाईल. बटाट्याची साल रगडल्यानेही दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.

Read More