Marathi News> हेल्थ
Advertisement

रक्तातील कोलेस्ट्रॉल खेचून काढतील पाच उपाय, निरोगी आरोग्यासाठी हे कराच!

What Is The Best Medicine For High Cholesterol: कोलेस्टॉल कमी करण्यासाठी तुमच्या जीवनशैलीत काही बदल करणे गरजेचे आहे.   

रक्तातील कोलेस्ट्रॉल खेचून काढतील पाच उपाय, निरोगी आरोग्यासाठी हे कराच!
Updated: Jul 01, 2024, 12:55 PM IST

What Is The Best Medicine For High Cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढणे हे आरोग्यासाठी खूप गंभीर आहे. कोलेस्ट्ऱॉल म्हणजे तुमच्या रक्तातील चिकट मेणासारखा पदार्थ. खरं तर कोलेस्ट्रॉल लिव्हरच्या माध्यमातून तयार होते किंवा मग आपण जे खातो-पितो त्यामुळंही कोलेस्ट्रॉल तयार होते. शरीर निरोगी राहण्यासाठी कोलेस्ट्रॉलची गरज तर असतेच मात्र, त्याची पातळी वाढली तर अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. शरीरात कोलेस्ट्रॉल खूप जास्त तयार झाले तर हृदय विकार, स्ट्रोक आणि हार्ड अॅटेकसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. वर्ल्ड हार्ट फेडरेशनच्यानुसार, हाय कोलेस्ट्रॉलमुळं दरवर्षी 4.4 मिलियन लोकांचा मृत्यू होते. कोलेस्ट्रॉल कसं नियंत्रणात ठेवायचं? याबाबत जाणून घेऊया. 

WFHने दिलेल्या माहितीनुसार, काही औषधे जसे स्टेटिन हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास व त्यापासून वाचण्यासाठी मदत करु शकतात. मात्र, तुम्ही उत्तम आहारा आणि जीवनशैली सुधारल्यास कोलेस्ट्रॉल कमी करु शकता. त्यामुळं आहारात काही बदल करणे गरजेचे आहे. कोलेस्ट्रॉल कमी झाल्यास हृदय विकार आणि स्ट्रॉकचा धोकादेखील टळतो. त्यामुळं आहार कसा असावा याचा सविस्तर माहिती घ्या. 

मीठाचे सेवन 

आहारात जास्त मीठ घेऊ नका. ज्या पदार्थांमध्ये जास्त मीठ असते त्याचे सेवन करणे टाळा. त्याऐवजी फळ, भाज्या आणि कडधान्यांचे सेवन जास्त करा. 

मांस 

तुम्ही दररोज जेवणात मांस खाणे टाळा. यात आढळणारे फॅट कोलेस्ट्रॉलची मात्रा वेगाने वाढवते. त्याऐवजी हेल्दी फॅट असलेल्या पदार्थांचे सेवन करा. तसंच, वजनही नियंत्रणात ठेवा. 

स्मोकिंग 

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी व त्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्हाला आत्ताच स्मोकिंग सोडले पाहिजे. त्या व्यतिरिक्त रोज कमीत कमी 30 मिनिटे चालले पाहिजे. 

मद्यपान आणि ताण तणाव 

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुम्हाला मद्यपानपासून चार हात लांबच राहायला पाहिजे. त्याचबरोबर ताण-तणावदेखील कमी केला पाहिजे. कोलेस्ट्रॉल कमी करणे जरी कठिण असले तरी अशक्य नाहीये. फक्त त्यासाठी तुमच्या जीवनशैलीत थोडासा सुधार आला पाहिजे. सुरुवातीला तुमच्या कोलेस्ट्रॉलची तपासणी करुन घ्या, त्यानंतर तुमच्या जीवनशैलीत काही बदल करुन घ्या. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)