Marathi News> हेल्थ
Advertisement

Health Tips: पिवळ्या टोमॅटो सारखं दिसणाऱ्या 'या' फळाची भारतीय बाजारपेठेत चर्चा!

इंग्रजीमध्ये याला परसिमन (Persimmon) असं म्हटलं जातं. शेतीविषयातील तज्ज्ञ या फळाचं ओरीजीन चीन मानतात.

Health Tips: पिवळ्या टोमॅटो सारखं दिसणाऱ्या 'या' फळाची भारतीय बाजारपेठेत चर्चा!

Vitamin a rich food: सध्या भारतीय मार्केटमध्ये एका फळाची तुफान चर्चा सुरु आहे. हे फळ आपल्या भारतातील नसून चीन मधलं आहे. सामन्यपणे लोकं या फळाला अमरफळ म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये याला परसिमन (Persimmon) असं म्हटलं जातं. शेतीविषयातील तज्ज्ञ या फळाचं ओरीजीन चीन मानतात.

पिवळ्या टोमॅटो सारखं दिसणाऱ्या या फळाचे अनेक फायदे देखील आहेत. भारतीय बाजारपेठांमध्ये हे फळं फार लोकप्रिय आहे. थंडीच्या दिवसांमध्ये या फळाच्या सेवनाने इम्युनिटी वाढण्यास मदत होते. यामुळे अनेक आजारांपासून तुमचं रक्षण होतं. यामध्ये अनेक पोषक तत्त्व असतात ज्यामुळे आजार तुम्हाला होऊ शकत नाही. 

अमरफळाचे फायदे (Amarfal Fruit Benefits)

  • अमरफळाचे फायदे पाहता या फळाला सुपरफुड्सच्या लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. यामध्ये व्हिटीमीन इ, के, बी1, बी2, फोलेट, पोटॅशियम, कॉपर आणि इतर पोषक तत्त्व असतात. यामध्ये मॅग्नेशियम आणि फॉस्फरस आणि मॅग्नेशियम भरपूर असतं.
  • अमरफळामध्ये एंटीऑक्सिडंट्स इम्यून सिस्टला मजबूत करतात. यामुळे तुमचं शरीर रोगांची लढण्यासाठी उत्तम होतं. हे मौसमी आजारांदरम्यान शरीर निरोगी ठेवतं.
  • अमरफळामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स, फ्लेव्होनॉइड्स आणि क्वेर्सेटिन हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करतात. हे फळ मल्टीविटामिनसाठी एक उत्तम स्रोत मानला जातो. 
  • हिवाळ्यामध्ये अनेकांचं वजन वाढू लागतं. अशावेळी या फळांचं सेवन केल्याने भूक कमी लागते. याशिवाय तुम्ही जास्त प्रमाणात खातंही नाही.
Read More