Marathi News> हेल्थ
Advertisement

चेहऱ्यावर पिंपल आल्यास 'या' चुका टाळा, अन्यथा होईल मोठं नुकसान

चेहऱ्यावर पिंपल आलेत, मग या चुका टाळा 

चेहऱ्यावर पिंपल आल्यास 'या' चुका टाळा, अन्यथा होईल मोठं नुकसान

मुंबई : चेहऱ्यावर पिंपल आल्यास त्वचेचे सौंदर्य खराब होते. मात्र चेहऱ्यावर पिंपल येण्याची अनेक कारणे आहेत. तसेच पिंपल आल्यास तिला लपवण्यासाठी अथवा घालवण्यासाठी जे प्रयत्न करतात त्यामुळे देखील तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत ते जाणून घेऊयात. 

फेसवॉश करू नका 
तेलकट त्वचेमुळे पिंपल्सची समस्या अधिक असते. असे लोक चेहऱ्यावरील तेल काढण्यासाठी फेसवॉश वारंवार करतात. असे केल्याने तुमच्या त्वचेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे फेसवॉश पुन्हा पुन्हा करण्यापेक्षा टिश्यू पेपरने चेहऱ्यावरील तेल काढून टाकणे चांगले राहील. 

उशाचे कव्हर न बदलणे
त्वचेवर पुरळ येत असताना उशाचे कव्हर वारंवार बदला. उशीचे कवर न बदलल्यास उशीमध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स वाढण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे आठवड्यातून किमान दोनदा उशीचे कव्हर बदलण्याचा प्रयत्न करा.

स्पर्श करू नका 
जर तुम्हाला पिंपल्सला वारंवार स्पर्श करण्याची सवय असेल तर ही सवय लगेच बदला. पिंपल्सला वारंवार स्पर्श केल्याने पिंपल्स वाढण्याचा धोका असतो. तसेच, यामुळे चेहऱ्यावर डागही येऊ शकतात.

चांगले प्रोडक्टस वापरा
जर तुम्ही त्वचेवर योग्य उत्पादनांचा वापर केला नाही तर त्याचे दुष्परिणाम होण्याचा धोका असतो. त्यामुळे तुमच्या त्वचेनुसार उत्पादने निवडण्याचा प्रयत्न करा. यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

वाफ घेणे टाळा
वाफ घेतल्याने त्वचेला खूप फायदा होतो. पण पिंपल्सच्या वेळी वाफ घेतल्यास ते छिद्र मोठे करते, त्यामुळे या छिद्रांमध्ये जास्त तेल जमा होऊ शकते. त्यामुळे ते टाळल्यास तुम्हाला फायदा होईल.  

 (Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)  

Read More