Marathi News> हेल्थ
Advertisement

वेळीच सावध व्हा! पुऱ्या, पापड तळून उरलेलं तेल पुन्हा वापरणं पडेल महागात, कसं ते जाणून घ्या

असं करण्याचे थेट परिणाम आरोग्यावर होतात. 

वेळीच सावध व्हा! पुऱ्या, पापड तळून उरलेलं तेल पुन्हा वापरणं पडेल महागात, कसं ते जाणून घ्या

मुंबई : घरात एखादं शुभकार्य असो, सण असो किंवा मग असाच एखादा खास दिवस. मेजवानी करण्यासाठीच घरातील अनेकजण आग्रही असतात. साग्रसंगीत जेवण वाढलेलं पान पुढ्यात आलेलं कोणाला चालणार नाही. साग्रसंगीत म्हणावं तर, या पानात पुरीपासून मीठापर्यंत सर्वच आलं. 

जेवणाच्या पानात टम्म फुगलेली पुरी दिसली रे दिसली की ती फस्त करण्यासाठी अनेकांना क्षणांर्धाचाही विलंब करता येत नाही. तिथं पुरी तळण्यासाठी वापरण्यात आलेलं तेल पुन्हा कसं वापरता येईल याचाच विचार स्वयंपाकघरात काम करणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यात घोंगावत असतो. यावर पर्यायही सुचतो. तेल वाया जाण्याऐवजी दुसऱ्या दिवशी किंवा येणाऱ्या दिवसांमध्ये भाजी, वरण किंवा आणखी एखाद्या पदार्थासाठी या तेलाचा वापर करण्याला प्राधान्य दिलं जातं. पण, तुम्हाला माहितीये का, असं करण्याचे थेट परिणाम आरोग्यावर होतात. 

जेवणासाठी वापरण्यात आलेलं तेल पुन्हा गरम केल्यास त्यातून विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीरात फ्री रेडिकल्सही बनतात, ज्यामुळं सूज येण्यापासून अनेक जुने आजार ओढवले जाण्याचा धोका असतो असं म्हणतात. FSSAI (Food Safety and Standards Authority of India) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार एकदा वापरलेलं तेल पुन्हा गरम करणं टाळावं. FSSAI (Food Safety and Standards Authority of India) नुसार तळलेल्या वस्तू वापरल्यानंतर ते तेल फक्त तीन वेळेसच वापरता येऊ शकतं. पण, तज्ज्ञांच्या मते शक्यतो ही बाब टाळावी. 

उच्च तापमानावर तापवण्यात आलेलं तेल विषारी धूर सोडतं. वापरलेलं तेल हे गरम होण्यापूर्वीच धूर सोडतं. या तेलातील फॅट मोलेक्युल्स काही अंशी तुटू लागतात. जेव्हा हे तेल स्मोक पॉईंटवर जातं, तेव्हा प्रत्येक वेळी त्याचा वापर केल्या उग्र वास येऊ लागतो. अशा वेळी आरोग्यास पदार्थ हवेत आणि अन्नातही मिसळले जातात. 

रोगांना आमंत्रण 
तळलेल्या तेलाचा वारंवार वापर केल्यास हृदयरोग, अॅसिडीटी, कॅन्सर, अल्झायमर, पार्किंसंस, गळ्यात जळजळ अशा रोगांना आमंत्रण दिलं जातं. ऑक्सीडेटिव तनाव (oxidative stress), उच्च रक्तचाप (hypertension), एथेरोस्क्लेरोसिससाठीही तळलेल्या तेलाचा दुसऱ्यांदा केलेला वापर कारणीभूत ठरतो. 

Read More