Marathi News> हेल्थ
Advertisement

health News : कर्करोग आणि मधुमेहापासून वाचवेल लाल कोबी; जाणून घ्या फायदे

Health News : सर्दीच्या दिवसात लोकं आपल्या आहारात हिरव्या भाज्यांचा (vegetables) समावेश मोठ्या प्रमाणात करतात. परंतु या लाल भाजीचा समावेश आपल्या डाएटमध्ये समावेश केल्याने तुमच्या शरीराला अनेक चांगले फायदे अनुभवायला मिळतील. 

health News : कर्करोग आणि मधुमेहापासून वाचवेल लाल कोबी; जाणून घ्या फायदे

Lal Kobi benefits : आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे आपले दुर्लक्ष होत असल्याने अनेक आजारांना सामोरे जावे लागते. याच अयोग्य वाचावरणाचे योग्य उदाहरण म्हणजे लठ्ठपणा. शरीरात वाढणाऱ्या अतिरिक्त चरबीमुळे अनेक आजारांची शिकार होत आहेत.

काहीही करुन तुमच्या शरीराचा अतिरिक्त वाढणारा लठ्ठपणा (obesity) घालवण्यासाठी तुमच्या रोजच्या आहारात लाल रंगाच्या कोबीचा (Red Cabbage) समावेश करणे आवश्यक आहे. या लाल रंगाच्या कोबीचा वापर शक्यतो जास्त वापर कोशिंबीरीत केला जातो. लाल रंगाच्या कोबीमध्ये भरपूर प्रमाणात लोह, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन के असते. ते शरीरातील पोषक तत्वांच्या कमीला पुर्ण करते. 

कर्करोग आणि मधुमेहीसाठी फायदेशीर 

आरोग्य तज्ञांच्या मते वजन घटवण्यासाठी लाल रंगाच्या कोबीचे (Red Cabbage) सेवन फारचं उपयोगी ठरते. याबरोबरचं शरीरातील साखरेच्या पातळीला नियंत्रित राखण्याचे काम करते. याला जर आपण आपल्या डाएटमध्ये समाविष्ट केले तर केवळ लठ्ठपणा नाहीच तर तुमचे गंभीर अशा कर्करोग आणि मधुमेहापासून संरक्षण करेल.

वाचा : लग्नाच्या दिवशी वधू-वरामध्ये झालं तुफान भांडण; नक्की काय घडलं? पाहा Viral Video

लाल कोबी हा तुमच्या शरीरातील चरबी कमी करतो त्यामुळे तुमचे वजन हळू हळू कमी होऊ लागेल. एका संशोधनात असे समोर आले आहे की त्यात असलेले अँथोसायनिन पॉलीफेनॉल कर्करोग, हृदयरोग आणि मधुमेह यांसारख्या अनेक आजारांचा धोका कमी करते. 

पोषक तत्वांनी परिपुर्ण 

लाल कोबीमध्ये फायबर प्रमाण जास्त असते. हे फायबर पोटाच्या पाचन तंत्राला सुधारते आणि अपचनाची समस्या दूर करते. आरोग्य तज्ञांच्या मते लाल कोबी आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. यामध्ये असलेले अँटी-एजिंग गुणधर्मामुळे तुमची त्वचा सामान्यपेक्षा तरुण दिसते. याचे सेवन केल्यामुळे डोळ्यांखाली येणारी काळी वर्तुळे गायब होतात. आणि त्वचेचा मंदपणा निघून जातो.  

Read More