Marathi News> हेल्थ
Advertisement

या '५' फायद्यांसाठी लवकर झोपणे योग्य!

रात्री अर्धवट झोप झाल्यास दिवसभर थकल्यासारखे आणि अस्वस्थ वाटते.

या '५' फायद्यांसाठी लवकर झोपणे योग्य!

मुंबई : रात्री अर्धवट झोप झाल्यास दिवसभर थकल्यासारखे आणि अस्वस्थ वाटते. सातत्याने अपुरी झोप मिळाल्यास त्याचा परिणाम तुमच्यावर आणि तुमच्या आरोग्यावर होतो. मोबाईलच्या व्यसनामुळे  झोपेचे चक्र बिघडले. कारण रात्रभर सोशल मिडिया अपडेट्स चेक करत राहण्याची सवय आपल्याला लागली आहे. तसंच काही नसेल तर इंटरेस्ट नसलेल्या वेबसाइट्स आपण चेक करत राहतो.

रात्री कॉफी पिणे, फ्रेंड्स, कलीगसोबत गप्पा करणे यामुळे ही झोप येत नाही. तसंच गप्पा करताना किती कॉफी घेतली जाते याचा अंदाजच नसतो आणि त्यातील कॅफेनचा झोपेवर परिणाम होतो. परंतु, अपुऱ्या झोपेचा परिणाम चेहऱ्यावर आणि कामावर दिसू लागतो. पिंपल्स येणे, कार्यक्षमता कमी होणे या समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागू शकते.

चेहऱ्यावरील डाग कमी होऊ लागतील

लवकर झोपण्याचे परिणाम चेहऱ्यावर दिसू लागतात. पिंपल्स कमी होऊ लागले. आणि डागही हळूहळू कमी होतील.

ब्लड ग्लुकोज कमी होत नाही

अचानक ब्लड ग्लुकोज कमी होण्याचा त्रास दूर होतो. 

भूकेत सुधारणा होईल

भूक लागत नाही हे कारण आता भूतकाळात जमा होईल. हेल्दी पदार्थ खावेसे वाटतील. आधीपेक्षा अधिक चांगले आणि आरोग्यदायी पदार्थ खाण्याची इच्छा प्रबळ होईल.

मायग्रेनचा त्रास कमी होईल

आजकाल कमी खाणे, जास्त किंवा कमी झोप, खूप रडणे किंवा खूप हसणे या कशाही मुळे मायग्रेनचा त्रास जाणवणार नाही. पुरेशी झोप घेतल्याने मायग्रेनचा त्रास कमी होण्यास मदत होईल. आणि आता कोणतीही गोळी न घेता राहू शकता. 

कार्यक्षमतेत वाढ होईल

८ तास पुरेशी आणि शांत झोप घेतल्यामुळे अधिक उमेदीने, तत्परतेने काम करू शकाल. कार्यक्षमता वाढेल. आता तुम्हाला जाणवेल की, झोपेचा परिणाम कामावर होतो आणि पुरेशा झोपेमुळे कामही उत्तम होते.

Read More