Marathi News> हेल्थ
Advertisement

आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर मीठ मिसळण्याचे '4' आरोग्यदायी फायदे

बदलत्या वातावरणाचा परिणाम जसा थेट आरोग्यावर होतो तसाच तो त्वचेवरही होतो.

आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर मीठ मिसळण्याचे '4' आरोग्यदायी फायदे

मुंबई : बदलत्या वातावरणाचा परिणाम जसा थेट आरोग्यावर होतो तसाच तो त्वचेवरही होतो.

ऋतूमानामध्ये बदल झाल्यानंतर त्वचाविकार जडण्याची शक्यता असते. त्वचाविकार हे काही काळापुरते वाढत असतात. अशावेळेस सुरूवातीच्या टप्प्यामध्ये अनेकदा लोकं आजाराकडे लक्ष देत नाही. जसाजसा त्रास वाढतो तसा त्रास अधिक गंभीर होऊ शकतो. म्हणूनच वेळीच या समस्येला रोखण्यासाठी पाण्यामध्ये चिमूटभर मीठ मिसळा.  टबबाथमध्ये ‘accidental drowning’ चा धोका टाळण्यासाठी खास टीप्स

मीठ पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे - 

स्कीन इन्फेक्शनचा धोका टाळण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात मीठ मिसळणं फायदेशीर आहे. या पाण्याच्या आंघोळीमुळे खाज येण्याच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.  

त्वचेला तजेलदार ठेवण्याची क्षमता मीठाच्या पाण्यामध्ये आहे.कारण मीठ जंतूनाशक म्हणूनही काम करते.  

सांधेदुखीचा त्रास असणार्‍या व्यक्तींना मीठाच्या पाण्याने आंघोळ करणं अधिक फायदेशीर आहे.  

कंबरेच्या दुखण्यावरही मीठाचे पाणी फायदेशीर आहे. मीठ आणि पाणी हे मिश्रण जसे जंतूनाशक असते तसेच दाहशामकदेखील आहे.  

Read More