Marathi News> हेल्थ
Advertisement

रिकाम्या पोटी बेदाण्याचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' कमाल फायदे !

  द्राक्षांना सुकवून बेदाणे / किसमिस बनवले जातात.

रिकाम्या पोटी बेदाण्याचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' कमाल फायदे !

मुंबई :  द्राक्षांना सुकवून बेदाणे / किसमिस बनवले जातात. त्यामध्ये आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फायबर घटक मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे आरोग्यासाठी द्राक्ष फायदेशीर आहेत. बेदाणांप्रमाणेच त्याचे पाणीदेखील आरोग्यदायी आहे. 

आरोग्यदायी बेदाणे 

बेदाणांमध्ये नैसर्गिकरित्या साखर मुबलक प्रमाणात असल्याने रात्रभर बेदाणे पाण्यात भिजत ठेवा. यामुळे साखरेचा अंश कमी होऊन न्युट्रीशनल व्हॅल्यू वाढते. 

बेदाण्यांमुळे शरीर डिटॉक्स होण्यास म्दत होते. त्याचं पाणी टॉक्सिन घटक बाहेर टाकण्यास मदत करते.  

बेदाण्यांमधील फायबर घटक पचन संस्थेला चालाना देण्यास मदत करतात. यामुळे पचन सुधारते. 

बेदाण्यांमध्ये अ‍ॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे घशातील इंफेक्शन, तोंडाला येणारी दुर्गंधी कमी होते. 

बेदाण्यांमध्ये कॅल्शियम आणि मायक्रो न्युट्रीएंट्स असतात. यामुळे हाडांना मजबुती मिळते. 

बेदाण्यांमधील आयर्न घटक अ‍ॅनिमियाच्या रूग्णांना फायदेशीर ठरते. यामुळे शरीरात रक्त वाढण्यास मदत होते. 

फायबरसह बेदाण्यांमध्ये असलेले अनेक आवश्यक पोषकघटक शरीरातील कोलेस्ट्रेरॉलची पातळी सुधारण्यास मदत करते. त्यामुळे हृद्याचे विकार असणार्‍यांसाठी बेदाणे फायदेशीर ठरतात. 

कसा कराल उपाय 

कपभर गरम पाण्यामध्ये मूठभर स्वच्छ धुतलेले बेदाणे भिजत ठेवा. सकाळी हे पाणी थोडं गरम करून प्यावे. त्यानंतर बेदाणेदेखील चावून खावेत. 

Read More