Marathi News> हेल्थ
Advertisement

अक्षय्य तृतीया विशेष : 'या' आरोग्यदायी फायद्यांंसाठी आजपासून आंंब्यावर ताव मारा

.... या फायद्यांंसाठी आहारात आंब्याचा नक्की समावेश करा 

अक्षय्य तृतीया विशेष : 'या' आरोग्यदायी फायद्यांंसाठी आजपासून आंंब्यावर ताव मारा

मुंबई : उन्हाळ्यात वाढणारा उन्हाचा तडाखा, सतत येणारा घाम, वाढणारं  पित्तं आणि घामोळ्या हे सारे त्रासदायक असले तरीही रसदार आंब्यांची चव चाखण्यासाठी प्रत्येकाला उन्हाळाला हवाहवासा वाटतो. हापुस, तोतापुरी, पायरी, बदामी अशा विविध प्रकारातील आंबे चवीला जितके मधूर असतात तितकेच आरोग्यालाही पौष्टिक असतात.

अक्षय्य तृतीयेला देवाला आंब्याचा नैवेद्य दाखवून त्यावर ताव मारायला सुरूवात होते. मग तुम्ही अजूनही यंदाच्या सीझनचा आंबा खाल्ला नसेल तर या आरोग्यदायी फायद्यांसाठी नक्की चाखा आंब्याची चव... 

रोगप्रतिकारशक्ती वाढते

फिजिशियनच्यामते, एक सर्वसाधारण आकाराचा आंबा हा बटर किंवा बदामांपेक्षा अधिक पौष्टिक आहे. आंब्यामुळे शरीरातील नसा, टिश्यू, स्नायू मजबूत होतात. तसेच शरीर आतून स्वच्छ होते व रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

कर्करोगाची समस्या कमी होते

आंब्यामध्ये फायबर, व्हिटामिन्स, मिनरल्स व अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात. आंब्यामुळे आतड्यांचे, स्तनाचे व प्रोस्टेट ग्रंथींचा कर्करोग होण्यापासून बचाव होण्यास मदत होते. तसेच आंब्यात कॅरोटिन असल्याने फुफ्फुसाच्या कर्करोगापासूनही बचाव होतो.

दृष्टी सुधारते

आंब्यामुळे शरीराला व्हिटामिन ए, बीटा कॅरोटिन व अल्फा कॅरोटिन यांचा मुबलक पुरवठा होतो. यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते व दृष्टी उत्तम राहते.

रक्तदाब नियंत्रणात राहतो

ताज्या आंब्यामधून शरीराला पोटॅशियमचा पुरवठा होतो. पोषणतज्ञांच्या मते, 100 ग्राम आंब्यातून 156 ग्राम पोटॅशियम तर 2 ग्रॅम सोडीयम मिळते. पोटॅशियमच्या योग्य प्रमाणामुळे हृद्याचे ठोके व  रक्तदाब संतुलित राहतो.

त्वचेचा पोत व कांतीही सुधारते

आंब्यामुळे ‘व्हिटामिन ए’ चा शरीराला मुबलक पुरवठा होतो. यामुळे त्वचेचा पोत सुधारतो तसेच कांती सुधारते.

हृदयविकार  कमी होतात

आंबे हे ‘व्हिटामिन बी6’, ‘व्हिटामिन सी’ व ‘व्हिटामिन ई’ यांनी परिपुर्ण असतात. तसेच ‘व्हिटामिन सी’ मुळे शरीरात अपायकारक रॅडीकल्सशी सामना करण्याची क्षमता वाढते.   ‘व्हिटामिन बी6’ मुळे रक्तातील ‘होमोसेस्टीना’चे प्रमाण संतुलित राहते व हृद्यविकाराचा धोका कमी होतो.

अ‍ॅनिमियापासून बचाव होतो 

आंब्यात तांब्याचे प्रमाणही मुबलक असते. तांबे हे शरीरात लाल रक्त पेशी निर्माण करण्यास मदत करतात.तांंब्याच्या भांड्यातून 'या' पदार्थांचं सेवन ठरू शकतं 'विषारी'

आंब्याचे काही घरगुती उपाय –

केसगळती किंवा अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येपासून सुटका –

केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी आंब्याच्या कोयीचे तेल वापरा. कोयीमध्ये व्हिटामिन व मिनरल्सचे प्रमाण मुबलक असते.  आंब्याच्या कोयीचे तेल बाजारात विकत घेण्यापेक्षा कोयीच्या बाहेरील भाग काढून काढा व आतील गर खोबर्‍याच्या, तीळाच्या  किंवा मोहरीच्या तेलात घालून ठेवा. ते भांडे काही दिवस उन्हात ठेवा. या तेलाचा वापर केल्याने केसांचे आरोग्य सुधारते. केसगळतीच्या समस्येमागे तुमच्या या '7' चूका कारणीभूत

2.  रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रित करण्यासाठी  आंब्याची पाने फार उपयुक्त आहेत. 3-4 आंब्याची पाने पाण्यात उकळा व रात्रभर हे पाणी असेच राहू द्या. दुसर्‍या दिवशी सकाळी पाने वाटून त्याचा रस प्या. मधूमेहींंनो ! आहारात आंंब्याचा 'असा' समावेश करणं आरोग्यदायी...

Read More