Marathi News> हेल्थ
Advertisement

उन्हाळ्यात माठाचे पाणी शरीरासाठी अमृत

उन्हाचा कडाका इतका वाढलाय की अंगाची नुसती लाही लाही होतेय. यावेळी आपल्या शरीराला थंड ठेवणे गरजेचे असते. 

उन्हाळ्यात माठाचे पाणी शरीरासाठी अमृत

मुंबई : उन्हाचा कडाका इतका वाढलाय की अंगाची नुसती लाही लाही होतेय. यावेळी आपल्या शरीराला थंड ठेवणे गरजेचे असते.  उन्हाळ्यात शरीरातील ओलावा कायम राखण्यासाठी पाण्यासोबतच भरपूर फळे आणि भाज्यांचे सेवन करणे गरजेचे असते. यासोबतच उन्हाळ्यात माठातील पाणी हे शरीरासाठी अमृतासमान असते. माठ हा गरीबांचा फ्रीज मानला जातो. जर तुम्हाला असे वाटत असेल की फ्रीजच्या तुलनेत माठाचे पाणी कमी थंड असते तर तुम्ही चुकत आहात. तज्ञांच्या मते माठाच्या पाण्यात शरीरासाठी लाभदायक असे गुण असतात. माठातील पाणी अनेक रोगांशी लढण्यात फायदेशीर ठरते. 

हे पाणी प्यायल्याने पाचनक्रिया सुरळीत होते. शरीरातील अनावश्यक घटक बाहेर टाकण्यास मदत होते. जर तुम्ही नियमितपणे माठातील पाणी पित आहात शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. याशिवाय रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत करतात. 

पोट साफ राहते

माठातील पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. यामुळे पोट साफ राहण्यास मदत होते. अनेकदा थंड पाणी प्यायल्याने घश्यात त्रास होतो. मात्र जर तुम्ही माठातील पाणी पित आहात तर तुमच्या घश्याला कोणताही त्रास होणार नाही. 

Read More