Marathi News> हेल्थ
Advertisement

आरोग्यासाठी बीटचे 7 मोठे फायदे

बीट खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

आरोग्यासाठी बीटचे 7 मोठे फायदे

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात स्वत:वर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. अनेक जण फक्त पोट भरण्यासाठी भोजनाला महत्त्व देतात. पण तुम्ही योग्य वेळी योग्य आहार घेतला तर तुम्हाला याचा मोठा फायदा होईल. रोजच्या आहारात बीटचा वापर केला तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे होऊ शकतात. बीटमध्ये अनेक आरोग्यदायी गुण आहेत.

बीटचे फायदे

1. रक्तदाब नियंत्रण : बीट खाल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. गाजर आणि बीटचा 1-1 कप रस पिल्याने याचा मोठा फायदा होता. ब्लडप्रेशर असलेल्या व्यक्तींना बीट नेहमी खायला द्या.

2. रक्ताची कमतरता : रोज सकाळी 1 कप बीटचा रस प्यायल्याने त्याचा खूप मोठा फायदा होता. यामुळे किडनी स्टोनची समस्या देखील दूर होते. रोज 30 ग्रॅम बीट खाल्याने याचा मोठा फायदा होतो. यामुळे लीवरची सूज देखील कमी होते.

3. कॅल्शिअमची स्रोत : बीट कॅल्शिअमची पूर्तता करतो. कॅल्शिअम शरिरासाठी महत्त्वाचं तत्व आहे. कॅल्शिअममुळे हाडे आणि दात मजबूत होतात. बीट शरिरातील कॅल्शिअमची कमतरता दूर करतो. मुलांनी आणि युवकांनी बीट चाऊन खालं पाहिजे. यामुळे दात आणि हिरड्या मजबूत होतात.

4. कफचा त्रास : बीटमुळे कफ होण्याची समस्या दूर होते. बीट श्वसननलिका श्वच्छ ठेवते. बीटच्या रसमध्ये मध टाकून लावल्याने शरिरावर खाज येते त्या ठिकाणी लावल्याने ही समस्या दूर होते. 

5 सांधे दुखी थांबते : बीटमुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो. बीटमध्ये सोडियम, पोटेशियम, फॉस्फरस, कॅल्शिअम, सल्फर, क्लोरीन, आयोडीन, आयरन, विटामिन बी1, बी2 आणि सी मोठ्या प्रमाणात असतात. यामध्ये कॅलरीज खूप कमी असते.

6. गॅसची समस्या : दोन चमचे बीटचा रस आणि मध एकत्र खाल्याने गॅसची समस्या दूर होते. बीटमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने पोटाशी संबंधिस समस्या दूर होतात. बीट रोज खाल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. 

7. महिलांसाठी लाभदायक : बीटमध्ये फॉलिक अॅसिड असतं. जे गर्भवती महिला आणि गर्भात असलेल्या बाळासाठी फायदेशीर असतं. बीटमुळे महिलांना ऊर्जा मिळते. मासिक पाळी जर नियमित येत नसेल आणि यावेळी त्रास होत असेल तर बीट खाल्याने त्यापासून सूटका होते. रक्त वाढवण्यात बीट फायदेशीर ठरतं. बीटमुळे दूध वाढतं.

Read More