Marathi News> हेल्थ
Advertisement

तेजपत्त्यांचंं 'हे' हेल्दी ड्रिंक देईल अनेक दुखण्यापासून आराम !

भारतीय खाद्यसंस्कृती मसाल्याच्या पदार्थांशिवाय अपूर्णच आहे.

तेजपत्त्यांचंं 'हे' हेल्दी ड्रिंक देईल अनेक  दुखण्यापासून आराम !

मुंबई : भारतीय खाद्यसंस्कृती मसाल्याच्या पदार्थांशिवाय अपूर्णच आहे. तेजपत्त्याची पानं आरोग्यदायी आहेत. त्यामुळे केवळ आहारात पदार्थांची चव वाढवण्यासाठी नव्हे तर औषधी गुणधर्मासाठी त्याचा फायदा होतो. तेजपत्त्यामध्ये कॉपर, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम घटक मुबलक प्रमाणात असतात. 

फायदेशीर तेजपत्त्याचं पान 

तेजपत्त्यांच्या पानांमध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक असतात. यामुळे कॅन्सर, हृद्याचे आरोग्य जपयला मदत होते. तेजपत्त्यांच्या पानांचा रस शरीरातील अनेक दुखणी कमी करण्यास मदत करतात. 

कसा बनवाल तेजपत्त्याचं हेल्दी ड्रिंक  

साहित्य -

3 मोठी तेजपत्त्याची पानं
2 लिंबू
अर्धा लीटर पाणी 

हेल्थ ड्रिंक बनवण्यासाठी तीन तेजपत्त्याची पानं स्वच्छ धुवून ठेवा. त्यानंतर लिंबाचे 7-8 तुकडे करावेत. भांड्यामध्ये अर्धा लीटर पाणी उकळा. त्यामध्ये तेजपत्त्याची पानं आणि लिंबू मिसळा. हे मिश्रण उकळा. एक उकळी आल्यानंतर हे मिश्रण गाळून थंड करुन प्यावे.  

कसासाठी फायदेशीर 

तेजपत्त्याच्या पानांमध्ये दाहशामक आणि अ‍ॅन्टी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे शरीरातील सूज कमी होते. सोबतच शरीराचे दुखणे कमी करायला मदत होते. 

Read More