Marathi News> हेल्थ
Advertisement

ब्रेड- बटर आणि 'या' पदार्थाच्या सेवनानं आरोग्यास धोका; ICMR च्या सूचना विचार करायला भाग पाडतील

ICMR On Bread Butter : नाश्त्याला रोज ब्रेड बटर खाताय? पाहा तुमच्या आरोग्यावर कसा होतोय परिणाम... केंद्र सरकारकडून आलेल्या सूचना पाहिल्या?  

ब्रेड- बटर आणि 'या' पदार्थाच्या सेवनानं आरोग्यास धोका; ICMR च्या सूचना विचार करायला भाग पाडतील

Health News : बन मस्का किंवा ब्रेड, बटर हा अनेकांचाच नाश्ता.  दैनंदिन जीवनामध्ये ब्रेड बटर खाऊन दिवसाची सुरुवात करणारी अनेक मंडळी तुम्हाला ठाऊक असतील. पण, तुम्हाला माहितीय का, हेच पदार्थ नकळत तुमचा घात करत आहेत. 

आयसीएमआरच्या नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी नमूद केल्या आहेत. ज्यामध्ये ब्रेड, बटर आणि जेवणासाठी वापरण्यात येणारं तेल या पदार्थांची गणती हानिकारक पदार्थांमध्ये करण्यात आली आहे. आयसीएमआरच्या माहितीनुसार ब्रेड, सीरियल्स, चिप्स, केक, बिस्कीट, फ्राईज, जॅम, सॉस, मेयोनीज, आइस्क्रीम, प्रोटीन पॅक पावडर, पीनट बटर, सोया चंक्स, टोफू या पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. 

आयसीएमआरकडून सी विभागात एडिटिव्सपासून तयार करण्यात आलेलं पनीर, बटर, मांस, धान्य, बाजरी आणि प्रोसेस्ड पीठाचे प्रकार यांसह एनर्जी ड्रींक आणि दूध, शीतपेय यांसारख्या पदार्थांचाही समावेश करण्यात आला आहे. 

अल्ट्रा प्रोसेस्ड फूड म्हणजे काय? 

विकत मिळणारं पीठ विविध कारखान्यांमध्ये धान्य मोठ्या आचेवर गरम करून दळलं जातं. अनेक दिवसांसाठी ते टिकून राहावं यासाठीच ही प्रक्रिया केली जाते. ज्यामध्ये कृत्रिम घटक आणि एडिटिव्स मिसळण्यात येतात. दुधालाही पाश्चराईज्ड केलं जातं. या सर्व प्रक्रियांमध्ये खाद्यपदार्थांमधील पोषक तत्त्वं नष्ट होऊन आरोग्याच्या दृष्टीनं ते अधिक घातक ठरण्याचा धोका असतो. 

हेसुद्धा वाचा : राज्यात महायुतीला बसणार धक्का? मविआच्या वाट्याला किती जागा? पाहा ‘झी २४ तास’ टीमने वर्तविलेले अंदाज!

प्रचंड प्रक्रियांतून बाहेर पडणाऱ्या पदार्थांमुळं अर्थात अल्ट्रा प्रोसेस्ड फूड खाल्ल्यामुळं स्थुलता, हृदयविकाराचा झटका, पक्षाघात यांसारख्या व्याधींचा धोका असतो. वरील सर्व पदार्थ अतिशय सहजपणे विक्रीस उपलब्ध असून, ते एक उत्तम पर्यायही ठरतात. ज्या कारणामुळं या पदार्थांमध्ये साखर आणि मीठाचं प्रमाणही अधिक असतं. परिणामी त्यांच्यामधी विटामिन, फायबरसारख्या पोषक तत्त्वांना नाश होऊन शरीरास शून्य फायदा होतो. त्यामुळं अशा पदार्थांपासून दुरावा पत्करणंच उत्तम. 

Read More