Marathi News> हेल्थ
Advertisement

केसांच्या सौदर्यांसाठी हेअर मास्क ठरतोय फायदेशीर, जाणून घ्या

केसांच्या उत्तम पोषणासाठी चेहऱ्याच्या मास्कप्रमाणे केसांच्या मास्कचा वापर करणे उपयुक्त

केसांच्या सौदर्यांसाठी हेअर मास्क ठरतोय फायदेशीर, जाणून घ्या

मुंबई : वातावरणातील बदल आणि सततच्या वाढत्या उष्णतेमुळे केसांवर परिणाम होऊ लागला आहे. लॉकडाऊनमुळे सध्या स्पा आणि कॉस्मेटिक क्लिनिक बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे नागरिकांच्या चिंतेच भर पडली आहे. केसांचे सौदर्यांची योग्य पद्धतीने काळजी घेण्यासाठी चांगल्या दर्जेचे शॅम्पू आणि कंडिशनिंगचा वापर करणे गरजेचं आहे. याशिवाय अतिशय महत्त्वाचं म्हणजे, केसांच्या उत्तम पोषणासाठी चेहऱ्याच्या मास्कप्रमाणे केसांच्या मास्कचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे कॉस्मेटिक सर्जरी इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ कॉस्मेटिक सर्जन डॉ. मोहन थॉमस यांनी सांगितले.

केसांच्या मुखवटामधील घटक सामान्यत: अधिक केंद्रित असतात आणि मुखवटा आपल्या केसांवर जास्त काळ राहिल्याने केसांची निगा राखली जाते. यामुळे २० मिनिटांपासून अधिक तासांसाठी केसांच्या मुळांपर्य़ंत हे पौषक घटक टिकून राहतात. या मुखवट्यामध्ये घरगुती उपचारासाठी वापण्यात येणाऱ्या प्रामुख्याने दही, मध, अंडी यांसारख्या पौष्टिक घटकांचा समावेश आहे.

केसांच्या मुखवटाचे फायदे?

केसांच्या मुखवटाचे अनेक फायदे आहेत. मुखवटा हा तयार करण्यासाठी त्यासाठी वापरण्यात आलेल्या घटकांवर अवलंबून आहे. यामुळे केसांचे कमीत कमी नुकसान होते. या केसांच्या मुखवटयामुळे केस गळणे थांबते, केस तुटत नाहीत, केसांची निगा राखली जाते, केसात कोंडा होत नाही, केस मऊ व चमकदार दिसू लागतात आणि केस अधिकच मजबूत होण्यास मदत मिळते.

निगा राखण्यासाठी घरगुती साहित्य

१) केळी आणि नारळ तेल हे केसांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त आहे. केळ्यांमध्ये आढळणारे सिलीकामुळे केस मऊ चमकदार रेशमी करण्यास फायदेशीर ठरतात. तसेचे टाळूतील कोरडेपणा कमी करण्यात मदत मिळते. तर नारळाच्या तेलाचा वापर कंडिशनर म्हणूनही करता येऊ शकतो. कोमट तेलाने केसांच्या मुळांना मसाज करा. यामुळे केसांची वाढ होईल. नारळाचे तेल स्कॅल्पना पोषण देते तसेच कोंड्याची समस्या दूर करते. याशिवाय केस गळण्याचे प्रमाणही कमी होते.

२) तेलकट टाळूमुळे डोक्यात कोंडा होण्याची शक्यता अधिक असते. अशा स्थितीत दही, सफरचंद आणि कोरफड यांचे मिश्रण करून केसांना लावावेत. यामले केसातील कोंड्याची समस्या दूर होते. दहीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि केसांच्या वाढीसाठी जीवनसत्त्वे जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे केसांची निगा राखली जाते.

३) केस कमकुवत असल्यास गळण्याची व तुटण्याची समस्य जाणवते. यासाठी अंडी, मध आणि ऑलिव्ह ऑईलचा वापर करणे फायदेशीर आहे. अंड्यातील आतील पिवळ्या बलकात जीवनसत्त्वे ए आणि ई असतात. ज्यामुळे केस मजबूत होण्यात मदत मिळते.

केसांचा मुखवटा कसा वापरायचा?

केस धुवून ते सुकल्यानंतर मास्क लावावेत. नारळ किंवा ऑलिव्ह ऑईल केसांना लावल्यास अधिक फायदा होतो.

केसांचे रक्षण करण्यासाठी ते जुन्या कापड्याचे बांधा

केस लांब असल्यास केसांची क्लिप वापरून आपले केस विभागून घ्या

डोक्यातील कोंडा काढण्यासाठी केसांच्या मुळांपर्य़ंत योग्य पद्धतीने तेल लावा
सामान्यत: मुखवटे ३० मिनिटांसाठी ठेवावे लागतात. परंतु काही मुखवटे वापरलेल्या घटकांवर अवलंबून १२ तासांपर्यंत ठेवू शकता.

केसांमध्ये अधिक आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करण्यासाठी केस कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. त्यानंतर आपण कोरडे हवा घालू शकता आणि आपले केस स्टाईल करू शकता.

कोरड्या केसांसाठी आठवड्यातून एकदा केसांचा मुखवटा वापरा. तर तेलकट केसांसाठी २ आठवड्यात एकदा या मास्कचा वापर करावा.

Read More