Marathi News> हेल्थ
Advertisement

नखं एकमेकांवर घासल्याने केसांची वाढ होते का?, काय आहे सत्य

आपल्या हाताची नखं एकमेकांवर घासल्याने केसांची वाढ होते. मात्र खरंच अशी नखं एकमेकांवर घासल्याने केसांची वाढ होते का?

नखं एकमेकांवर घासल्याने केसांची वाढ होते का?, काय आहे सत्य

Health News : आता अनेक तरूणांना कमी वयातच केस गळतीची समस्या आहे. बाजारातील अनेक प्रोडक्ट वापरूनही काही फायदा होत नाही उलट त्याचा दुसरा काहीतरी साईड इफेक्ट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. योग गुरू बाबा रामदेव यांनी एक दावा केला होती की, आपल्या हाताची नखं एकमेकांवर घासल्याने केसांची वाढ होते. मात्र खरंच अशी नखं एकमेकांवर घासल्याने केसांची वाढ होते का? काय आहे सत्य जाणून घ्या. (hair growth tips advantages and disadvantages of nail rubbing latest marathi health news)

हे एक आसन असून त्याचं बालमय आसन असं आहे. हे रिफ्लेक्सोलॉजीच्या तत्त्वावर कार्य करतं. वैज्ञानिकांच्या मते, हातांची नखे रक्तवाहिन्यांद्वारे मज्जासंस्थेशी जोडलेली असतात. जर तुम्ही दोन्ही हातांची नखे घासली जातात तेव्हा रक्तपुरवठा मोठ्या प्रमाणात होऊ लागतो. त्यामुळे डोक्याचाही रक्तपुरवठाही वाढतो त्याचा फायदा केसांची वाढ होण्यास मदत होते.

केसांची वाढ कॉर्टिकल पेशींमुळे होते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या पेशी केराटिन नावाच्या प्रथिनापासून बनलेल्या असतात. जेव्हा नखे ​​एकत्र घासतात ते केराटिनच्या वाढीस प्रोत्साहन देते. ज्यामुळे कॉर्टिकल पेशी तयार होतात आणि डोक्याचे केस मजबूत होत जातात.

आसन सर्वांसाठी फायदेशीर असले तरी मधुमेहाचे रुग्ण आणि गर्भवती महिलांनी हे आसन करणे टाळावं. त्याचसोबत ज्यांची अँजिओग्राफी झाली आहे त्यांनीही हे आसन करू नये. नाहीतर तुमच्या आरोग्यासाठी धोक्याचं ठरू शकतं.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Zee 24 तास याची पुष्ठी करत नाही.)

 

Read More