Marathi News> हेल्थ
Advertisement

H3N2 Virus: महाराष्ट्रात H3N2 घालणार धुमाकूळ? सर्दी, खोकला, ताप अंगावर काढू नका

H3N2 Influenza Virus: ज्याची भीती होती तेच महाराष्ट्रात घडलंय. H3N2 या व्हायरसने राज्यातला पहिला बळी घेतलाय. अहमदनगरमध्ये एका तरुणाचा या व्हायरसमुळे मृत्यू झालाय. हा रुग्ण मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी होता. अहमदनगरबाहेर फिरून आल्यानंतर रुग्णामध्ये फ्लूची लक्षणं दिसत होती.

H3N2 Virus: महाराष्ट्रात H3N2 घालणार धुमाकूळ? सर्दी, खोकला, ताप अंगावर काढू नका

H3N2 Influenza Virus: कोरोनानंतर (Corona) आता नव्या व्हायरसची लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून H3N2 या व्हायरसने थैमान घातलं होतं. मात्र ज्याची भीती होती तेच महाराष्ट्रात घडलंय. H3N2 या व्हायरसने राज्यातला पहिला बळी घेतलाय. अहमदनगरमध्ये एका तरुणाचा या व्हायरसमुळे मृत्यू झालाय.. 

मेडिकल कॉलेजचा होता विद्यार्थी

हा रुग्ण मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी होता. अहमदनगरबाहेर फिरून आल्यानंतर रुग्णामध्ये फ्लूची लक्षणं दिसत होती. आता या रुग्णाच्या संपर्कातल्या 19 जणांचे नमुनेही तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. नगरमधली आरोग्य यंत्रणा अलर्ट झालीय.

दरम्यान शहरात सगळ्यांनी मास्क घालावं, अशी सूचना आयुक्तांनी केली आहे. तर नागपूरमध्ये H3N2 मुळे एका 78 वर्षांच्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात येतोय. 

यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी याबाबत काळजी घेण्यातं आवाहन केलं आहे. आरोग्यामंत्री म्हणाले, H3N2 या व्हायरसमुळे मृत्यू होत नाही. याची लागण झालेला रूग्ण 2 दिवसांत बरा होता. याबाबत आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. ज्या ठिकाणी संशयित रुग्ण आढळून येतील, त्यांच्यावर उपचार केले जातील.

त्यामुळे आजार अंगावर काढू नका. प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे. ताप असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा”,असंही आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलंय. 

H3N2 ला हलक्यात घेऊ नका

  • मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, संभाजीनगर आणि इतर शहरांमध्ये H3N2 वाढतोय 
  • तुम्हाला सर्दी, खोकला, ताप अशी कुठलीही लक्षणं दिसली तरी डॉक्टरांकडे जा 
  • कोरोनासंबंधी कुठलंही लक्षण असेल तरी डॉक्टरांचा सल्ला घ्या 

H3N2 बरोबरच कोरोनानं राज्यात कमबॅक केलंय. 24 तासांत कोरोना रुग्ण दुपटीनं वाढलेत. त्यामुळे राज्याची डोकेदुखी प्रचंड वाढलीय. तुम्हीही काळजी घ्या, कुठलंही दुखणं अंगावर न काढता वेळीच डॉक्टर गाठा.

काय आहेत H3N2 ची लक्षणं?

ताप येणं, घशात खवखव, सर्दी, नाक सतत वाहणं, अंगदुखी, थकवा ही या आजाराची लक्षणं आहेत. काही रूग्णांना डोकेदुखी आणि डिहायड्रेशनचा त्रास जाणवतोय. H3N2ची लागण झालेल्या रूग्णांना 100 डिग्रीपेक्षा जास्त ताप येतो. 4 ते 5 दिवसांपासून ते महिनाभर खोकला राहू शकतो. त्यामुळे अशी लक्षणं जाणवल्यास तातडीने डॉक्टरांती मदत घ्यावी.

Read More