Marathi News> हेल्थ
Advertisement

Cholesterol Home Remedy : 'या' झाडाची पाने खूप प्रभावी! कोलेस्ट्रॉल ते यूरिक अ‍ॅसिडवर फायदेशीर

जर तुम्ही कोलेस्ट्रॉल आणि युरिक ॲसिडच्या समस्येमुळे त्रस्त आहात. ते या फळाच्या पानांचं सेवन तुमच्यासाठी फायदेशीर आहे. घरच्या घरी तुम्ही कोलेस्ट्रॉल आणि युरिक ॲसिड या उपायाने नियंत्रण मिळवू शकता. एवढंच नाही तर या पानांचा रसाने तुमचं वजन कमी होण्यासही मदत मिळते.   

Cholesterol Home Remedy : 'या' झाडाची पाने खूप प्रभावी! कोलेस्ट्रॉल ते यूरिक अ‍ॅसिडवर फायदेशीर

Cholesterol Ayurvedic Kadha : गेल्या काही वर्षांमध्ये बदलेल्या जीवनशैलीमुळे कोलेस्ट्रॉल आणि यूरिक अ‍ॅसिडच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. आपल्या आरोग्याबद्दल असंख्य लोक जागृत असून त्यांनी पौष्टिक आहार आणि व्यायामावर लक्ष केंद्रित केलंय. शिवाय कोरोना महामारीनंतर लोकांचा घरगुती उपाय आणि आयुर्वैदिक उपचारांकडे कल वाढला आहे. पण उच्च कोलेस्ट्रॉल आणि उच्च यूरिक ऍसिडमुळे आरोग्याचा अनेक समस्या मानवाला गाठतात. खास करुन उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा झटका येण्याची दाट शक्यता असते. अशात आयुर्वैदात एका फळ झाडांची पानं तुमच्यासाठी फायदेशीर आहे, असं सांगण्यात आलंय. त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. शिवाय या पानांचा रस घेतल्यास तुम्ही वजनही कमी करु शकता. (guava leaves tea Home Remedy cholesterol uric acid weight loss Ayurvedic Kadha )

 'या' झाडाची पाने खूप प्रभावी!

पेरू आरोग्यासाठी फायदेशीर तर आहेच पण या झाडाची पानेही खूप फायदेशीर मानली जातात. पेरूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळतं. पेरूप्रमाणेच त्याची पाने देखील फायबरचा समृद्ध स्रोत मानला जातो. या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट्सही आढळतात. याशिवाय त्यात फ्लेव्होनॉइड्सचे प्रमाणही जास्त असते. उच्च कोलेस्ट्रॉल आणि उच्च यूरिक ऍसिडची समस्या असल्यास पेरूच्या पानांचे सेवन फायदेशीर मानले जाते. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, तुमचा आवाज सर्दीमुळे बसला असेल तर पेरूचा पानांना गरम पाण्यात उकळून त्या पाण्याने गार्गल केल्यास आवाज मोकळा होण्यास मदत मिळते. 

पेरूच्या पानांचे सेवन कसं करावं?

पेरूच्या पानांचे सेवन तुम्ही दोन प्रकारे करू शकता. सगळ्यात पहिले, तुम्ही पेरूची पाने पाण्यात उकळून ते पाणी पिऊ शकता. या पानांपासून तुम्ही चहाही तयार करु शकता. याशिवाय पेरूची पाने कच्ची चघळूनही खाऊ शकता. 

पेरूच्या पानांचे फायदे

कोलेस्ट्रॉल कमी होईल

शरीरात जमा झालेले खराब कोलेस्ट्रॉल अनेक शारीरिक समस्यांना कारणीभूत ठरतं. खराब कोलेस्टेरॉल हे मेणासारखे असतं आणि शिरांमध्ये जमा होतं. त्यामुळे हातपाय दुखणे, लठ्ठपणा, हृदयविकार, तीव्र हृदयविकाराचा झटका आदी समस्या उद्भवतात. पेरूच्या पानांचा चहा प्यायल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळते. पेरूची पाने पाण्यात उकळून चहाप्रमाणे प्या. 

वजन कमी होतं

पेरूच्या पानांचे सेवन केल्याने वजन कमी होते. पेरूच्या पानांचा चहा प्यायल्याने चरबी लवकर वितळण्यास मदत मिळते. फळांमध्ये असलेले कॉम्प्लेक्स कार्बोहाइड्रेट साखरेमध्ये रुपांतर होण्यास प्रतिबंध करतात आणि वजन कमी करण्याची प्रक्रिया जलद सुरू करतात. 

यूरिक अ‍ॅसिडसाठी फायदेशीर 

युरिक ऍसिडमुळे सांधेदुखी होते. तसंच पाय सुजायला लागतात. अशा प्रकारे पेरूची पाने यूरिक अ‍ॅसिड कमी करण्यास मदत करतात. पेरूची पाने शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतात. यामुळे युरिक ऍसिड तयार होण्याचे प्रमाण कमी होते. 

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

व्हिटॅमिन सी समृद्ध पेरूची पाने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. याच्या सेवनाने आजारांचा धोका कमी होतो. चहा बनवण्याऐवजी या पानांची चटणी बनवूनही सेवन तुम्ही करु शकता. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.) 

Read More