Marathi News> हेल्थ
Advertisement

आता गुगल देणार ब्रेस्ट कॅन्सरची माहिती?

ब्रेस्ट कॅन्सरची चाचणी केल्यानंतरही, डॉक्टर २० टक्के प्रकरणांची ओळख करण्यात चूक करत असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. 

आता गुगल देणार ब्रेस्ट कॅन्सरची माहिती?

नवी दिल्ली : जगात प्रत्येकी आठपैकी एका महिलेला स्तन कॅन्सर (breast cancer)असल्याची माहिती आहे. पण आता या आजाराबाबत लवकर माहिती मिळू शकणार आहे. एका नव्या शोधातून मिळालेल्या माहितीनुसार, गुगलचं (Google)आर्टिफियल इंटेलिजेंस (artificial intelligence) स्तन कॅन्सर लगेचच ओळखण्यासाठी पूर्णपणे सक्षम असल्याचं सांगण्यात आलं आहे. गुगल एकदा, मेमोग्राफी स्क्रीनिंग पाहून स्तन कॅन्सरबाबत सूचना देऊ शकतो. वैज्ञानिकांडूनही गुगलच्या या तंत्रज्ञानाचं कौतुक करण्यात आलं आहे.

ब्रेस्ट कॅन्सरची चाचणी केल्यानंतरही डॉक्टर २० टक्के प्रकरणांची ओळख करण्यात चूक करत असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरबाबत उशिरा माहिती मिळते. उशिरा उपचार सुरु झाल्याने त्याचा खर्च आणि वेदना अधिक होण्याची शक्यता असते. 

'नेचर पत्रिका'मधील शोधानुसार,  Google artificial intelligence ब्रेस्ट कॅन्सरच्या स्क्रिनिंगचा अगदी अचूक रिपोर्ट दाखवते. 'अमेरिकन कॅन्सर सोसायटी'नुसार, ब्रेस्ट कॅन्सर असल्याचं निदान झालेल्या अर्ध्याधिक महिलांना याबाबत चुकीची माहिती देण्यात आली आल्याचं सांगण्यात आलं आहे.

रिपोर्टनुसार, AI युनिटने कॅन्सरचा लवकरात लवकर शोध लावण्यासाठी एक प्रोग्राम सुरु केला आहे. यामध्ये लंडनमधील इंपिरियल कॉलेज आणि इंग्लंडमधील नॅशनल हेल्थ सर्विसच्या हजारो मेमोग्राफिक रिपोर्ट्सचा समावेश करण्यात आला. AIची चाचणी करण्यासाठी संशोधकांनी इंग्लंडमधील जवळपास  २५ हजार ८५६ आणि अमेरिकेतील ३०९७ रिपोर्ट्सची सखोल चाचणी करण्यात आली. मशीनने डॉक्टरांच्या तुलनेत अधिक चांगल्या प्रकारे कॅन्सराची प्रकरणं दाखवली. डॉक्टरांकडून देण्यात आलेल्या रिपोर्ट्समधून मशीनने, जवळपास ५.७ टक्के कॅन्सरच्या प्रकरणांना चुकीचं ठरवलं.

  

Read More