Marathi News> हेल्थ
Advertisement

कचऱ्यात फेकणाऱ्या 'या' वस्तूने घालवू शकता फ्रीजमधील येणारा उग्र वास!

घरातील फ्रिजमधून येतोय उग्र वास? या तीन वस्तू ठेवा अन् मिळवा सुटका   

कचऱ्यात फेकणाऱ्या 'या' वस्तूने घालवू शकता फ्रीजमधील येणारा उग्र वास!

How to Clean Refrigerator : आता प्रत्येक घरामध्ये फ्रीज असलेला पाहायला मिळतो. फ्रीजमध्ये ठेवलेल्या काही पदार्थांमुळे त्यातून उग्र वास येऊ लागतो. वास जावा म्हणून आपण फ्रीज साफ करतो मात्र तरीही वास काही जात नाही. फ्रीजमधील दुर्गंधी येण्याची अनेक कारणं असू शकतात. दूध, ज्यूस किंवा काही अन्न ठेवताना ते सांडलं जातं त्याचाच खराब वास सुटतो. तुम्हीही या वासाने त्रस्त झाले असाल तर काही अशा गोष्टी आहेत ज्याने तुमच्या फ्रीजमधील उग्र वास जावू शकतो. 

घरामध्ये ब्रेड खाल्ला जात असेल, या ब्रेडचाच वापर करून तुम्ही फ्रीजमधील येणारी दुर्गंधी घालवू शकता. आपण ब्रेड आणले की त्यातील पहिला आणि खालचा ब्रेड हा शक्यतो फेकून देतो. मात्र असं करता ते ब्रेड तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवले तर फ्रीजचा वास जाण्यास मदत होते. ब्रेड फ्रीजमधील येणारा वास शोषून घेतो. 

फ्रीजचा वास दूर करण्यासाठी कॉफी बीन्स हा एक चांगला पर्याय आहे. कॉफीचा वास खूप तीव्र असतो आणि त्यामुळे ती फ्रीजचा वास सहजपणे दूर करू शकते.  वास येत असेल तर तुम्ही कॉफी बीन्सचा वापर करू शकता. यासाठी कॉफी बीन्स बारीक करून घ्या आणि नंतर एका भांड्यात टाका आणि फ्रीजमध्ये ठेवा त्याने उग्र वास निघून जाईल.

आपण खासकरून फळं फ्रीजमध्ये ठेवतो, त्यामध्ये जर संत्रा हे फळ असेल तर त्याचा रस काढून टाका. या रसाने संपूर्ण फ्रीज साफ करून घ्या. अशा पद्धतीने फ्रीज साफ करून झाल्यावर संत्र्याच्या साली फ्रीजमध्ये ठेवा. जेणेकरून वास जाण्यास मदत होईल. याला पर्याय म्हणून तुम्ही संत्र्यांच्या ऐवजी पुदिनाही वापरू शकता. 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Zee 24 तास याची पुष्ठी करत नाही.)

 

Read More