Marathi News> हेल्थ
Advertisement

Hair Growth: टक्कल वाढतंय? 'या' सवयी दूर करतील केस गळतीचा त्रास

क्षणाचीही वाट न पाहता स्वत:ला लावा या सोप्या सवयी   

Hair Growth: टक्कल वाढतंय? 'या' सवयी दूर करतील केस गळतीचा त्रास

Hair Growth: वाढत्या वयानुसार शरीरातही काही बदल घडण्यास सुरुवात होते. वाढत्या वयाचे थेट परिणाम मेटाबॉलिजमवरही (Metabolism) होताना दिसतात. तुमची त्वचा, नजर या साऱ्यासोबतच केसांचा पोतही बदलू लागतो. तुम्हाला माहितीये का, दर दोनपैकी एका व्यक्तीला वयाच्या 40 व्या वर्षापर्यंत केसगळतीच्या समस्येचा सामना करावा लागतो. वयानुरुप केसगळतीचा सामना अनेकांनाच करावा लागतो. पण, काहींच्या बाबतीत हे प्रमाण जास्त असल्यामुळं ही चिंतेची बाब ठरते. (faster Hair Growth remedies tips and tricks )

केगळतीच्या (Hairfall) समस्येपासून दूर जाण्यासाठी तुम्ही काही सवयींमध्ये महत्त्वाचे बदल करणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. तुम्हीही या समस्येनं त्रस्त आहात का? आताच वाचा या वळणावर तुम्ही नेमकं काय करणं गरजेचं आहे... 

डाएटमध्ये (Diet) करा Proteins चा समावेश - 
केसांची योग्य वाढ होण्यासाठी आहारात प्रोटीन्सचा समावेश करणं कधीही उत्तम. हेअर फॉलिकल्सही प्रोटीन्सपासूनच तयार झालेली असतात. आहारामध्ये या घटकाचं प्रमाण कमी झाल्यास बऱ्याचजणांना केस गळतीचा सामना करावा लागतो. यासाठी (Egg, Fish) अंड, मासे आणि कमी चरबीच्या मांसाहाराचा समावेश करा. 

वाचा : बदाम सालीसकट खाणे योग्य की अयोग्य, काय आहे Almond खाण्याची पद्धत

 

योग्य Vitamins - 
डोक्यावरील त्वचेसाठी Vitamin A बरीच मदत करतं. तर, Vitamin E मुळं डोक्यावरील त्वचेमध्ये रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत राहते. 

घरगुती उपाय (Home remedies)- 
अनेकदा घरातील काही लहानसहान गोष्टीसुद्धा तुमच्या केसगळतीच्या समस्येला दूर करु शकतात. लसुण, आलं आणि कांद्याचा रस केसांच्या मुळाशी लावून मसाज केल्यास त्याचा फायदाच होतो. काही आठवडे हा उपाय केल्यास केस गळतीची समस्या कमी होते. शिवाय केसांच्या मुळाशी मसाज केल्यामुळंही डोकं शांत होतं, डोळ्यांवरील ताणही कमी होतो. 

डाएटमध्ये बायोटीनही हवंच- 
बायोटीन किंवा Vitamin B7 सुद्धा केरेटीन उत्पादनासाठी फायद्याचं ठरतं. अंडी, ड्रायफ्रुट्स, मुळा, कांदा, ओट्स या पदार्थांमध्ये बायोटीनचं जास्त प्रमाण आढळतं. 

सुयोग्य प्रमाणात झोप- 
जेव्हा तुम्ही आराम करता, तेव्हा शरीरही काही पद्धतीत चुकलेली गाडी रुळावर आणत असतं. या परिस्थितीत ग्रोथ हार्मोन, सेल प्रोडक्शनही वेगात होतं. ज्यामुळं दररोज 8- 9 तासांची झोप आवश्यक ठरते. पुरेशी झोपही तुमच्या केसांची वाढ योग्य पद्धतीने होण्यास फायद्याची ठरते. 

Read More