Marathi News> हेल्थ
Advertisement

सतत कॉम्प्युटर समोर बसून काम करताय?, डोळ्यांच्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

तुमचे डोळे आजारी पडतायत का? 'या' लक्षणाद्वारे तुम्हाला कळलं

सतत कॉम्प्युटर समोर बसून काम करताय?, डोळ्यांच्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

मुंबई : आजकालची तरूणाई स्क्रिन सॅव्ही जास्त झाली आहे. ऑफिसच्या कंम्प्युटरमधून ब्रेक घेत नाही तेच स्मार्टफोनच्या स्क्रिनवर जातात.  यामुळे सतत स्क्रिनवर असल्याने डोळ्यांवर त्याचा परीणाम होतो. तुमचे डोळे आजारीही पडू शकतात. त्यामुळे डोळे आजारी पडले आहेत, हे  कसे ओळखता येणार आहेत,ते जाणून घेऊयात. 

डोळ्यातून पाणी येते
डोळ्यात पाणी येण्याची अनेक कारणे आहेत. पण सर्वात मोठे कारण म्हणजे डोळ्यांची कमजोरी. लिहिताना, वाचताना आणि बघताना डोळ्यातून पाणी येत असेल तर लगेच डॉक्टरांना दाखवावे.

अस्पष्ट दिसते
जेव्हा दृष्टी योग्य नसते तेव्हा गोष्टी अस्पष्ट दिसू लागतात. अनेक वेळा डोळे धुतल्यानंतरही पूर्णपणे स्पष्ट दिसणे शक्य होत नाही. जरी कधी कधी ते चांगले दिसते. ही समस्या सकाळच्या वेळी अधिक दिसून येते.

दिवसभर डोकेदुखी 
डोळे कमजोर असल्यास डोकेदुखी दिवसभर राहू शकते. अनेक वेळा लोक डोकेदुखीच्या गोळ्या घेत राहतात.त्यामुळे काही काळ आराम मिळतो, गोळीचा प्रभाव संपताच पुन्हा वेदना सुरू होतात. कधी कधी डोक्याच्या मागच्या बाजूलाही वेदना सुरू होतात. 

डोळ्यांना ससर्ग होतो
लॅपटॉपवर काम केल्याने, टीव्ही किंवा मोबाईल जास्त वेळ पाहिल्याने डोळ्यांवर ताण येऊ लागतो. अशा स्थितीत डोळ्यांना खाज सुटू लागते. त्यामुळे संसर्ग वाढतो. डोळे लाल होतात.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

Read More