Marathi News> हेल्थ
Advertisement

पावसाळ्यात दही खाणे फायदेशीर की हानिकारक? सेवन करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची गोष्ट

दह्यामध्ये असलेले कॅल्शियम, प्रथिने आणि जीवनसत्त्वे आरोग्यासाठी फायदेशीर असतात आणि पचन व्यवस्थित ठेवतात, पण...

पावसाळ्यात दही खाणे फायदेशीर की हानिकारक? सेवन करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची गोष्ट

मुंबई : पावसाळ्यात आपल्याला शरीराची जास्त काळजी घेणे गरजेचं आहे. कारण याकाळात आपण सर्वात जास्त आजारी पडतो. तसेच पावसाळ्यात खाण्यापिण्याची देखील विशेष काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात अनेकदा घरातील वडील मंडळी हिरव्या पालेभाज्या, कारलं वगैरे खाण्यास नकार देतात. याला काही आयुर्वेदिक आणि भौतिक कारणं आहेत. आहारतज्ज्ञांच्या मते पावसाळ्यात संसर्गजन्य रोगांचा धोका वाढतो, त्यामुळे बाहेरून येणाऱ्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये रोगजनकांचा धोका वाढतो.

त्यामुळे पोटाच्या समस्यांचा धोका वाढतो. त्याचप्रमाणे पावसात दही आणि त्यापासून बनवलेल्या वस्तूंचे सेवन न करण्याचा सल्ला देखील दिला जातो.

दह्यामध्ये असलेले कॅल्शियम, प्रथिने आणि जीवनसत्त्वे आरोग्यासाठी फायदेशीर असतात आणि पचन व्यवस्थित ठेवतात, पण पावसाळ्यात दही खाण्यास मनाई आहे, पण असं का? चला जाणून घेऊया पावसाळ्यात दही का खाऊ नये?

आयुर्वेदात  सकाळी किंवा दुपारच्या जेवणात दह्याचे सेवन करावे असे म्हणतात. रात्री दही खाऊ नये. पण दुसरीकडे पावसाळ्यात दही खाण्यास आयुर्वेदात बंदी आहे. यामागे आयुर्वेदिक कारणही आहे. पावसात दही खाण्याचे काही दुष्परिणाम होतात असे म्हणतात.

आयुर्वेदानुसार पावसाळ्यात शरीरातील दोष असंतुलित होतात. त्याच वेळी वात वाढतो आणि पित्ताचा संचय होतो. म्हणजेच पावसाळ्यात पोटासंबंधी अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. दही हा पचनासाठी चांगला घटक असला तरी पावसाळ्यामध्ये दही खाल्ल्याने शरीरातील छिद्र बंद होतात आणि अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या वाढतात.

पावसाळ्यात दही खाण्याचे दुष्परिणाम

पावसाळ्यात दह्याचे सेवन केल्याने घसा खवखवतो असे मानले जाते. दही खाल्ल्याने सांधेदुखी आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. पावसाळ्यात दही शरीरात संसर्ग वाढवते.

पावसाळ्यात दह्याव्यतिरिक्त दह्यापासून बनवलेल्या इतर पदार्थांचे सेवन करण्यासही मनाई आहे. उदाहरणार्थ, ताक, कारले, ढोकळा, दही, इडली इत्यादी.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)

Read More