Marathi News> हेल्थ
Advertisement

रोज-रोज दही खाणे आरोग्यासाठी चांगले असते का? दही खाण्याची योग्य वेळ कोणती?

Curd Benefits In Marathi: दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यात अनेक पोषक तत्वे असतात. अनेक जण जेवणात रोज दही खातात. 

रोज-रोज दही खाणे आरोग्यासाठी चांगले असते का? दही खाण्याची योग्य वेळ कोणती?

Health Tips In Marathi: दह्यात अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचे गुणधर्म असतात. त्यामुळं अनेक जण रोजच्या जेवणात मोठ्या आवडीने दही खातात. दह्यामुळं शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून निघते. पण दररोज दही खाणे चांगले असते का? शरीरासाठी अतिप्रमाणात दही खाल्ल्याने काही नुकसान तर होत नाही ना? दही खाण्याबाबत तज्ज्ञ काय म्हणतात हे जाणून घेऊया. तज्ज्ञांच्या मते कोणताही पदार्थ प्रमाणात खाल्ला तर त्याचे शरीरावर कोणतेही साइड इफेक्ट होत नाहीत. 

दहीदेखील प्रमाणात खाल्ल्यास त्याचे कोणतेही साइड इफेक्ट होत नाहीत. मात्र, रात्री दही खाल्ल्यास कफ होण्याची शक्यता असते. त्यामुळं डॉक्टर रात्रीचे दही खाण्यास विरोध करतात. दह्यामुळं शरीराला कोणते लाभ मिळतात, हे जाणून घेऊया. 

दह्यामुळं मिळते प्रोटीन

शरीरातील पेशी वाढण्यासाठी अमिनो अॅसिडची आवश्यकता असते. ते प्रोटीनमुळं मिळते. मसल्स, त्वचा, केस, नख यासाठी प्रोटीन खूप गरजेचे असते. अशातच रोज प्रोटीनयुक्त पदार्थ हवे असल्यास दही सगळ्यात चांगला स्त्रोत आहे. USDA च्या अनुसार, 100 ग्रॅम दही खाल्ल्यास 11.1 ग्रॅम प्रोटीनची पूर्तता करता येते. 

प्रोबायोटिक्स

आतड्यांमध्ये खूप सारे बॅक्टेरिया असतात. जे जेवण पचवणे ते पोषण मिळवण्यापर्यंत मदत करतात. त्यांची संख्या टिकवून ठेवण्यासाठी दही फायदेशीर आहे. दही खाल्ल्याने कब्ज, ब्लोटिंग, गॅस, पोटात गरमी यासारख्या समस्या दूर होतात. 

कॅल्शियम 

शरीरातील हाडांना बळकटी येण्यासाठी कॅल्शियम खूप गरजेचे असते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळं हाडे कमजोर होतात अशावेळी दही खावून कॅल्शियमची गरज भरुन काढू शकतो. दह्यामुळं कॅल्शियमचा चांगला स्त्रोत असतो. 

व्हिटॅमिन बी 12 

शरीरातील नसा, ब्रेन आणि रक्त वाढीसाठी व्हिटॅमिन 12 गरजेचे असते. व्हिटॅमिन 12चे प्रमाण खूप कमी पदार्थांमध्ये आढळले जाते. आजकाल अनेक लोकांमध्ये 
व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता भासते. अशावेळी दही खावून ती कमकरता भरुन काढू शकता. दही हे दूधापासून बनवले जाते त्यामुळं व्हिटॅमिन 12चे गुणधर्म दह्यात आढळले जातात. 

एनर्जी

तुम्हाला सतत थकवा व अशक्तपणा जाणवत असेल तर तुम्ही दही खाल्ले पाहिजे. दही खाल्ल्याने एनर्जी मिळेल आणि थकवा दूर होईल. रोज योग्य प्रमाणात दही खाल्ल्यास शरीराला अनेक प्रकारे फायदा मिळू शकतो. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

Read More