Marathi News> हेल्थ
Advertisement

धक्कादायक! ईयरफोनमुळे होऊ शकतात 'हे' आजार

ईयरफोनचे गंभीर परिणाम

धक्कादायक! ईयरफोनमुळे होऊ शकतात 'हे' आजार

मुंबई : अनेक जण ऑफिसला जाताना, प्रवासात असताना ईयरफोनवर गाणी ऐकणं पसंत करतात. अनेकांना चालताना, व्यायाम करतानाही ईयरफोन लावण्याची सवय असते. परंतु अतिप्रमाणात ईयरफोनचा वापर करणं शरीरासाठी अतिशय धोकादायक ठरु शकतं. ईयरफोनचा अतिवापर शरीराला नकळतपणे नुकसानकारक ठरुन त्यामुळे गंभीर आजार होण्याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

हृदयरोग आणि कर्करोग

दररोज ईयरफोनचा वापर करणं आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकण्याने हृदयाचे ठोके जलद होतात. त्यामुळे दररोज असं होत असल्यास हृदयासंबंधी अनेक समस्या वाढू शकतात. याशिवाय ईयरफोनमुळे कर्करोग होण्याचाही धोका संभवतो. ईयरफोनमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे हा धोका, नुकसान होण्याची शक्यता असते.

डोकेदुखी आणि झोप न येणे

ईयरफोनमधून निघणारे रेडिएशन आणि मॅग्नेटिक इफेक्ट डोकेदुखीचा त्रास वाढवतात. त्यामुळे झोप न येण्याची समस्या उद्भवू शकते. या रेडिएशनचे मेंदूवरही वाईट परिणाम होऊ शकतात.

कमी ऐकू येणे

ईयरफोनचा अधिक वापर कल्याने कानांवर अधिक दाब पडतो. व्यक्तीची ऐकण्याची क्षमता ९० डेसिबल इतकी असते. मात्र, सतत प्रमाणापेक्षा अधिक ईयरफोन वापरल्याने ऐकण्याची क्षमता ४० ते ५० इतकी होते. त्यामुळे ईयरफोनचा अतिवापर बहिरेपणा येण्याची शक्यता असते.

इन्फेक्शन 

ईयरफोन किंवा हेडफोनचा सतत वापर केल्याने इन्फेक्शनही होऊ शकते. अनेकदा लोक दुसऱ्याचे ईयरफोन वापरतात. अशामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे शक्यतो दुसऱ्यांचे ईयरफोन वापरणं किंवा इतरांना ईयरफोन देणं टाळावे. 

Read More